परंडा- शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी विम्याचे पैसे मिळाले असते तर त्याचा उपयोग झाला असता. सरकार पैसे पाठवते, मात्र शेतकऱ्यांना ते मिळत नाहीत, असा आरोप करून अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना एकदा संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्घव ठाकरे यांनी केली.
परंडा येथे शिवजलक्रांती योजनेच्या जलपूजन कार्यक्रमानंतर ते बोलत होते. देशात उद्योगधंदे आले पाहिजेत. मात्र शेतकऱ्यांचाही विचार झाला पाहिजे. शिवजल क्रांतीच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे झाल्यामुळे पहिल्याच पावसात पाणीसाठा वाढला. अन्यथा पाणी वाया गेले असते, असे ठाकरे म्हणाले. तानाजी सावंत यानी केलेल्या कामाचे कौतुक करण्यासाठी येथे आलो असल्याचे सांगून यात सरकार आपल्या परीने काम करीत आहे. परंतु शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी ही आग्रही मागणी सरकारकडे केली आहे, असे ठाकरे म्हणाले.
मागण्या, घोषणा आणि...- शेतकऱ्यांना वेळेत पीक विमा अनुदान वाटप करण्यात यावे.
- तालुक्यातील अल्पभुधारक शेतकऱ्यांना शिवसेनेच्या माध्यमातून सावंत प्रतिष्ठानच्या वतीने मोफत बियाणे वाटप.
- मराठवाड्यातील शेतकरी इमान राखणारा आहे. शेतकऱ्यांनी खचून आत्महत्या करू नये, शिवसेना आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.