आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाही इमामाला देशाचा पंतप्रधान ठरवू देणार नाही : उद्वव ठाकरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली - मुस्लिमांनीही आमच्यासोबत यावे. आम्ही त्यांच्याकडे केवळ ‘मत’ म्हणून नव्हे, तर ‘माणूस’ म्हणून बघू, असा विश्वास मुस्लिमांना देतानाच, सोनिया गांधींनी शाही इमामाला साकडे घातले आहे; परंतु आम्ही शाही इमामाला देशाचा पंतप्रधान ठरवू देणार नाही, असा इशाराही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंगोलीतील गुरुवारच्या सभेत दिला. शिवसेनेचे उमेदवार सुभाष वानखेडे यांच्या प्रचारार्थ आयोजित रामलीला मैदानावरील सभेत ते बोलत होते.