नांदेड- राज्यात होणार्या विधानसभा निवडणुकीत भगवा फडकणार आहे. भ्रष्टाचारी आघाडी सरकारला गणपतीसोबत विसर्जन करा, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले. उद्धव ठाकरे नांदेडमधील सभेत संबोधित केले. राज्याच्या विकासात गरिबांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे मतही उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले.
उद्धव ठाकरे म्हणाले, आगामी निवडणुकीत विधानसभेवर भगवा फडकवणार आहे. त्याआधी
आपल्याला गणपतीसोबत आघाडी सरकारचेही विसर्जित करावे लागणार आहे.
भ्रष्टाचारामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे संपूर्ण महाराष्ट्राला लुटले आहे. त्यामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे नामोनिशाण ठेवू नका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे. 'लव्ह जिहाद' भारतात आणणार असाल तर शिवसैनिक हिंदुस्थानात 'लव्ह हिंदुस्थान' आणतील, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
निवडणुकीच्या कामाला आजपासून लागा, अशा सूचनाही त्यांनी शिवसैनिकांना दिल्या आहेत.
(फोटो: उद्धव ठाकरे)