आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूरमधील उदगीर, अहमदपूर, औसा आणि निलंगा या चार नगरपालिकांसाठी आज मतदान; यंत्रणा सज्ज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर : जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर, औसा आणि निलंगा या चार नगरपालिकांसाठी बुधवारी (दि. १४) मतदान होणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्ण तयारी केली असून मतदान यंत्रे केंद्रावर पोहोचवण्यात आले आहेत.
पालिका निवडणुकांची जबाबदारी असलेले उपजिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी सांगितले की, चार पालिकांमधील ५० प्रभांगामधून १०१ नगरसेवक आणि ४ नगराध्यक्ष निवडून द्यायचे आहेत. नगराध्यक्षांच्या ४ जागांसाठी ३८ उमेदवार नशीब आजमावत आहेत. तर १०१ नगरसेवकपदांसाठी ५०१ उमेदवार रिंगणात आहेत. त्यांच्या भविष्याचा फैसला बुधवारी मतदानयंत्रात कैद होणार आहे.

सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. चार पालिकांमध्ये एकूण १ लाख ४९१५३ मतदार आपला हक्क बजावू शकणार आहेत. चारही पालिकांतील मतदारांनी मतदान करावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने जागृती केली आहे. २०३ मतदान केंद्रांवर होणाऱ्या मतदानासाठी ६२८ मशीन बसवल्या आहेत. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला आहे.
चारही पालिकांच्या हद्दीत एकूण ५४ अधिकारी नेमले आहेत. तर ६९६ पोलिस कर्मचारी तैनात केले आहेत. मंगळवारी दुपारपर्यंत सर्व मतदान केंद्रावर कर्मचारी रवाना झाले.
उद्या मतमोजणी

बुधवारी झालेल्या मतदानानंतर सर्व मतदान यंत्रे त्या-त्या तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी सीलबंद करून स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात येणार आहेत. गुरुवारी (दि. १५) सकाळी १० वाजता मतमोजणी होणार असून त्यानंतर निकाल जाहीर करण्यात येतील.

अशी आहे मतदार संख्या
उदगीर ६८४०४
अहमदपूर ३० २४
निलंगा २५९३४
औसा २५१७७
बातम्या आणखी आहेत...