आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बस पाससाठी आत्महत्येची वेळ येत असेल, तर राज्य करण्यास आम्ही नालायक : उद्धव ठाकरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - एसटी पासला पैसे नाहीत म्हणून लातूरमध्ये स्वातीसारख्या विद्यार्थिनीला आत्महत्या करायची वेळ येत असेल, तर आम्ही राज्यकर्ते राज्य करण्यास नालायक आहोत, अशा शब्दांत कबुली देतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर घणाघात केला.

शिवसेनेतर्फे दुष्काळग्रस्त १ हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी १० हजारांची मदत, आत्महत्याग्रस्तांच्या वारसांना एक शेळी, दोन पिल्ले व प्रत्येकी ५ हजार देण्यात आले. या वेळी उद्धव म्हणाले, स्वातीच्या आत्महत्येनंतर मी रावतेंना दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क व एसटी पास शुल्क मोफत करण्याची घोषणा करण्यास सांगितले. १० कोटीची ही योजना आहे. मराठवाड्यातील ४.५ लाख विद्यार्थ्यांना फायदा होत आहे. दुष्काळाचे दुष्टचक्र कधी थांबणार हे माहीत नाही. शेतीसोबत अन्य काही जोडधंदा करता येतो का तेही पहा. काही कल्पना असतील तर द्या, आमच्या कल्पना आम्ही मांडू. धीर सोडू नका. आत्महत्येचा मार्ग पत्करू नका, असे आवाहन उद्धव यांनी केले