आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेयसीचा खून करणाऱ्या मामा-भाच्याला अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळी - वीटभट्टीवर काम करणाऱ्या प्रेयसीने लग्नाचा तगादा लावल्याने प्रियकराने मामाच्या मदतीने प्रेयसीचा गळा दाबून खून केल्यानंतर मृतदेह खदानीत फेकून दिल्याची घटना परळी शहराजवळील दादाहरी वडगाव शिवारात शुक्रवारी रात्री उघडकीस आली आहे. परळी ग्रामीण पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
परळी शहराजवळील दाऊतपूर शिवारात आशू आरेफखाँ पठाण (२१, रा. गंगाखेड, जि. परभणी) ही तरुणी कुटुंबासह वीटभट्टीवर मजुरीचे काम करत होती. तेथेच राहणारा नजीर सुभान बागवान (२१) हा जेसीबीचालक म्हणून काम करत होता. नजीरचे त्या तरुणीबरोबर एक वर्षापासून प्रेमसंबंध जुळले होते. तरुणीने नजीर बागवान याच्याकडे लग्नाचा तगादा लावला होता. परंतु नजीर लग्न करण्यास टाळाटाळ करत होता. त्यामुळे दोघांमध्ये वाद होऊन तरुणीने त्याला आत्महत्या करण्याची धमकी दिली होती.

२६ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास नजीर बागवान याने आशूला “आपण पळून जाऊ’ असे खोटे सांगून मामा शेख अस्लम पाशा यांच्या मदतीने घराच्या बाहेर बोलावले. त्यानंतर घरापासून काही अंतरावर तरुणीचा गळा आवळून खून केल्यानंतर तरुणीच्या कमरेला दगड व दोरीने बांधून मृतदेह खदानीच्या पाण्यात फेकून दिला.
आठ दिवसांनंतर मृतदेह पाण्यावर तरंगला : आठ दिवसानंतर तरुणीचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे काही शेतकऱ्यांनी पाहिले. लोकांची खदानीजवळील गर्दी पाहून आरेफ पठाण हे खदानीजवळ गेले. तरुणीच्या अंगातील कपड्यावरून त्यांनी मृतदेह आशूचा असल्याचे ओळखले. त्यांनी ही माहिती परळी ग्रामीण पोलिसांना दिली. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला. अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात तो उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.

मामा-भाच्याला ठोकल्या बेड्या याप्रकरणी शवविच्छेदन अहवालात तरुणीचा खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. परळी ग्रामीण ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामचंद्र चाटे यांनी या प्रकरणाचा तपास लावला. अवघ्या बारा तासांत नजीर बागवान व त्याचा मामा शेख अस्लम पाशा या दोघांना त्यांनी अटक केली.
बातम्या आणखी आहेत...