आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपंग पुतणीवर चुलत्याचा बलात्कार, माजलगाव तालुक्यातील धक्कादायक घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजलगाव- अपंग व भोळसर पुतणीवर चुलत्यानेच बलात्कार केल्याची घटना माजलगाव तालुक्यातील लऊळ क्रमांक एक गावात उघडकीस आली आहे. यातून तरुणी गर्भवती राहिली आहे. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात मुलीने दिलेल्या तक्रारीवरून चुलत्यावर रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजलगाव तालुक्यातील लऊळ क्र. १ येथील चुलत्याने त्याच्या पुतणीवर अाठ महिन्यांपूर्वी एकाच महिन्यामध्ये सात वेळा बलात्कार केला होता. या प्रकारातून पीडित तरुणी गर्भवती राहिल्याचे कळताच चुलता घर साेडून दुसरीकडे राहण्यास गेला. हा प्रकार मानवी हक्क अभियानच्या महिला सदस्या सत्यभामा साैंदरमल यांना समजताच त्यांनी तत्काळ माजलगाव पाेलिसांना माहिती दिली. बीट अमलदार बी. डी. मांडवे व महिला पाेलिसांनी पीडित मुलीच्या घरी जाऊन चाैकशी केली. यानंतर नराधम चुलत्यासही ताब्यात घेण्यात आले.