आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई-वडील गेले होते शेतात, 8 वर्षीय चिमुरडीवर शेजारीच राहणाऱ्या नराधमाने केले अत्याचार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिराढोण- कळंब तालुक्यातील देवळाली येथे एका आठवर्षीय चिमुरडीवर शेजारीच राहणाऱ्या एका नराधमाने अत्याचार केल्याची घटना शनिवारी (दि.११) दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच शिराढोण पोलिसांनी आरोपीला गजाआड केले.  
 
देवळाली येथील पीडित चिमुकलीचे आई-वडील शेतात गेले होते. मुलगी एकटीच असल्याचे पाहून शेजारीच राहणाऱ्या  आरोपी भरत छगन एडके याने मुलीला स्वतःच्या राहत्या घरी छपरात बोलावून घेतले. त्यानंतर या आरोपीने या मुलीवर अत्याचार केला. 

या वेळी मुलीने आरडाओरडा केल्यावरही तिला सोडले नाही. परंतु पीडित मुलीने जोराने आरडाओरड केल्यावर आरोपीने तिला सोडून दिले. घडला प्रकार चिमुकलीने रडत जाऊन  शेजारी राहणाऱ्या एका महिलेस सांगितला. महिलेने एडके  याला याबाबत जाब विचारला असता, आरोपीने महिलेशीच अरेरावी केली.

सायंकाळी मुलीचे आई-वडील घरी आल्यावर महिलेने हा प्रकार त्यांना सांगितला. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून रविवारी (दि.१२) भरत एडके याच्याविरोधात शिराढोण पोलिस ठाण्यात अत्याचारप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात येऊन त्याला गजाआड करण्यात आले आहे. 
बातम्या आणखी आहेत...