आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युनिसेफने जालन्‍यातील चौदा वर्षीय मुलीचा बालविवाह थांबवला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घरगुती कार्यक्रम असल्याचे सांगून शाळेतून घरी घेऊन गेलेल्या पिठोरी सिरसगाव (ता.अंबड)येथील १४ वर्षीय मुलीचा बालविवाह जागरूक पालक, युनिसेफ व जिल्हा प्रशासनाच्या सतर्कतेमुळे थांबला.
घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात इयत्ता नववीच्या वर्गात ही मुलगी शिकते. जिल्हा बालहक्क संरक्षण समिती, विद्यालयाचे मुख्याध्यापक, सीईओ प्रेरणा देशभ्रतार, युनिसेफचे सल्लागार संदीप शिंदे आदींच्या प्रयत्नांनी बालविवाह थांबला.