आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Union Minister Maneka Gandhi Speak On Female Foeticide In Maharashtra

बीडमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण चिंताजनक, राज्यातील 5 जिल्ह्यांत स्त्रीभ्रुणहत्या जास्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांमध्ये हजार पुरुषांमागे महिलांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुलगा व्हावा या हव्यासापोटी स्त्रीभ्रुणहत्या करण्यात येत असल्याचे महिला व बाल विकास मंत्री मेनका गांधी सांगितले.
‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हे अभियान देशभरात राबविल्या जात असले तरी मुलीला ओझे समजणाºयांची संख्या देशात कमी झालेली नाही. गरोदर मातांची गर्भ तपासणी करून मुलगी असल्यास स्त्रीभ्रुणहत्या करण्यात येते. कायद्याद्वारे हा गुन्हा ठरत असला तरी 2001 आणि 2011 च्या जनगणनेची तुलना केली तर स्त्रीभ्रुणहत्येचे प्रमाण वाढले असल्याचे स्पष्ट होत असल्याची माहिती मेनका गांधी यांनी दिली.
महाराष्ट्रात 0 ते 6 पर्यंत वयोगटातील जनगणनेनुसार 1991 मध्ये हजार पुरुषांमागे महिलांची संख्या 946 होती. 2001 मध्ये ती 932 वर आली तर 2011 मध्ये 918 इतकी खाली घसरली. केंद्र सरकारने महिलांची संख्या अत्यंत कमी आहे अशा 100 जिल्ह्यांची नावे जाहीर केली असून त्या जिल्ह्यांना सावधानतेचा इशाराही दिला आहे.
महाराष्ट्रात बीडमध्ये 2001 मध्ये हजार पुरुषांमागे 894 महिला होत्या 2011 मध्ये या संख्येत पुन्हा घट होऊन ती 807 वर आली आहे. जळगावमध्ये 880 वरुन 842, अहमदनगर 884 वरुन 852, बुलडाणा 2001 मध्ये 908 तर 2011 मध्ये 855, औरंगाबाद 890 वरुन 858, वाशिम 918 वरुन 863, उस्मानाबाद जिल्ह्यात 894 वरुन 867, जालना येथे 903 वरुन 2011 मध्ये महिलांची संख्या 870 झाली तर सांगली येथे 2001 मध्ये महिलांची संख्या हजारामागे 851 होती तिच्या जरा वाढ होऊन ती 867 एवढी तर कोल्हापुरमध्ये 839 वरुन 863 झाली आहे.
या जिह्यांमधील जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सकांना यांना याबाबतची गंभीरता कळविण्यात आली असल्याकडेही मेनका गांधी यांनी लोकसभेत सांगितले.