आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीच्या पित्याला सहा महिन्यांसाठी दाढी, कटींग मोफत, केज तालुक्यातील कुंबेफळच्या सलून चालकाचा अनोखा उपक्रम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केज- मुलीचा जन्म झाल्यास तिचे  जावळ तर मोफतच पण तिच्या वडिलांना सहा महिने मोफत दाढी कटींग करण्याची सवलत बीड जिल्ह्यातील कुंबेफळ (ता. केज) येथील ईश्वरी हेअर कटींग सलूनचे चालक अशोक पवार यांनी दिली आहे. स्त्री जन्माच्या स्वागताचा फलक दुकानावर लावून अशोक यांनी बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानाच्या जनजागृतीत खारीचा वाटा उचलला आहे. 
   
वंशाचा दिवा म्हणजे मुलगाच, असे मानण्याची प्रथा पूर्वीपासून चालत आली. हुंड्याच्या अनिष्ट प्रथेमुळे मुलगी जन्माला आली तरी ती एक  ओझे  असल्याची मानसिकता बनत चालली होती. बीड जिल्ह्यात चार वर्षापूर्वी  स्त्रीभ्रुण हत्येचेे  प्रकार परळी, बीडमध्ये समाेर आले होते. जिल्ह्यात  एक हजार मुलांच्या जन्मदराच्या पाठीमागे मुलींचे जन्मदराचे प्रमाण ८००च्या आसपास होते. शासनाने गर्भलिंग चाचणीवर बंदी घातली. समाजात मुलगा- मुलगी असा भेदभाव न करता मुलीला वाढवा, शिकवा यासाठी जनजागृती केली जात आहे.

बीड जिल्ह्यात स्त्री जन्मदर वाढवण्यासाठी शासनाबरोबरच  सामाजिक संस्थाकडून जनजागृती केली जात आहे. केज तालुक्यातील बनकरंजा येथील रहिवाशी असलेले अशोक पवार यांनी  ही बेटी बचाओ,बेटी पढाअोचा नारा दिला आहे.  ज्याच्या  घरी मुलगी जन्माला आली आहे. त्या मुलीचे मोफत जावळच नाही, तर मुलीच्या पित्याची ६ महिन्यापर्यंत मोफत दाढी, कटींग करण्याचा संकल्प केला आहे. आज दाढी कटींगसाठी ग्रामीण भागात पन्नास रूपये आकारले जातात. त्यामुळे मुलीच्या पत्याचे सहा महिन्याचे पैसे वाचणार आहेत. या संकल्पाचा तसा फलक  दुकानावर लावून स्वागत लेकीचे असा समाजाला संदेश दिला जात आहे. 

संपूर्ण तालुक्यासाठी सेवा
मला श्रावणी नावाची मुलगी आहे. मुलींचा जन्मदर वाढला पाहिजे. त्यासाठी माझ्या हातून जनजागृती व्हावी म्हणून मी हा उपक्रम सुरू केला आहे. कुंबेफळच नाही तर तालुक्यातील मुलींच्या पित्याला ही मोफत सेवा देणार .    
अशोक पवार, ईश्वरी जेन्टस पार्लर, कुंबेफळ.
बातम्या आणखी आहेत...