आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवकाळीचा कहर : विश्रांतीनंतर पुन्हा हजेरी, वीज पडून जालन्यात एकाचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - मंगळवारी विश्रांती घेतल्यानंतर बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमाराला पावसाने शहरासह लोहा, अर्धापूर येथे हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह जवळपास अर्धातास पावसाची रिमझिम सुरू होती. बुधवारी शहरात ३ मिमी पाऊस झाल्याचे एमजीएम खगोलशास्त्र व अंतराळ तंत्रज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले.
बुधवारी सकाळपासून शहरात कडक ऊन तापले. दुपारनंतर अचानक आकाशात ढगांची गर्दी होऊन विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. सुदैवाने पावसासोबत वादळी वारे मात्र नव्हते. शहरात तापमानाचा पारा दुपारपर्यंत ३२ से. पर्यत वर चढला. परंतु पावसाचे आगमन झाल्यानंतर तापमानात तब्बल १० अंशाची घट झाल्याचे औंधकर यांनी सांगितले. पुढचे दोन दिवस हलक्या किंवा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचेही औंधकर म्हणाले.
चाकूरमध्ये पाऊस : चाकूर शहर व परिसरात बुधवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. सुमारे पाऊण तास बरसलेल्या या पावसाने रस्त्याकडेच्या खड्ड्यांत पाणी थांबले. िनलंगा, औराद शहाजानी, किल्लारी, उदगीर येथे हलका पाऊस झाला. सर्वत्र आभाळ ढगांनी गच्च झाले होते. त्यामुळे पावसाची शक्यता जाणवत होती.

धारूर, गेवराईत पाऊस
जिल्ह्यात बुधवारी दुपारी धारूर व गेवराई तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. धारूरमध्ये झालेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले. या तालुक्यातील असोला, आवरगाव, मैंदवाडी, तांदळवाडी, भाजयळी, गोपाळपूर, आरणवाडी, येथे दुपारी तीन वाजता पंधरा मिनिटे पाऊस झाला, तर गेवराईत दुपारी दहा मिनिटे पाऊस झाला. आष्टीसह, अंबाजोगाई, वडवणी, केजमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण होते.

वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
जालना तालुक्यातील वाघ्रूळ शिवारात बुधवारी सायंकाळी ४ वाजेच्या दरम्यान वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाला, तर ३० शेळ्या दगावल्या. शेख इस्माईल शेख जानू (३५, वाघ्रूळ, ता. जालना) असे मृताचे नाव आहे.
ही मिळताच आमदार अर्जुन खोतकर, जामवाडीचे सरपंच सुधाकर वाढेकर, तहसीलदार रेवणनाथ लबडे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी भेट िदली.

परभणीत पाचव्या दिवशीही मुसळधार
परभणी | मागील चार दिवसांपासून दररोज सायंकाळी हजेरी लावत असलेल्या पावसाने मंगळवारचा अपवाद वगळता बुधवारीही सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान एक तास जोरदार हजेरी लावली. दिवसभर असलेल्या ढगाळ वातावरणाचे रूपांतर विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसात झाले. जणू पावसाळाच सुरू झाल्याचा प्रत्यय परभणीकरांना आला.
मार्चअखेरपासून उन्हाचा पारा ४० अंशाच्या पुढे सरकू लागला असतानाच १० एप्रिलपासून वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. दररोज विशेषत: सायंकाळीच सहा ते आठच्या दरम्यान पाऊस हजेरी लावू लागला आहे. जोरदार पावसामुळे बहरात आलेल्या
आंब्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीस आलेल्या ज्वारीचेही मोठे नुकसान झाले आहे.