आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालन्यात वादळी बरसला;५० लाखांची उलाढाल ७ लाखांवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - सलग दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. यामुळे जालना येथील मोंढ्यातील होलसेल किराणा बाजारातील ५० लाखांची दैनंदिन उलाढाल गुरुवारी फक्त ७ लाख झाली. हेच चित्र भुसार मालात होते. मोंढ्यात रोज होणारी अडीच ते तीन हजार पोत्यांची आवक गुरुवारी ९०० पोती होती, असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनिल सोनी यांनी सांगितले.

जालना येथील मोंढ्यातील किराणा राज्यासह परराज्यातून मालाची ने-आण होते. यात प्रामुख्याने रवा, मैदा, साखर, डाळी, साबुदाणा, शेंगदाणे, मसाल्याचे पदार्थ आदींचा समावेश होतो. दररोज ३० ते ४० ट्रक माल येतो. जालन्यातून परगावी जाणाऱ्या मालवाहू ट्रकचा आकडाही एवढाच आहे. पावसामुळे व्यवहार ठप्पच राहिले. मोजकेच व्यापारी खरेदीसाठी आले होते.

वाहनांच्या गतीवर परिणाम
जालना एमआयडीसीत दिवसभरात परगावाहून भंगारचे ३०० ट्रक येतात, तर पक्का माल अर्थात सळईच्या २०० ट्रक भरून जातात. दोन दिवसांत मराठवाड्यातील काही भागांत पावसामुळे वाहनांची गती कमी राहिली. अन्यत्र वाहतुकीवर फारसा परिणाम झाला नाही.