आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदींसाठी आगामी लोकसभा निवडणूक अवघड : ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड- २०१९ ची लोकसभा निवडणूक मोदींसाठी अवघड आहे. प्रत्यक्ष राम जरी आले तरी नरेंद्र मोदी पंतप्रधान होणे अशक्य असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार पद्मश्री कुमार केतकर यांनी नांदेड येथे केले. ते एकदिवसीय पाचवे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलनात ‘राज्यघटनेतील सामाजिक संकल्पना’ या विषयावर बोलत होते. 

नांदेड येथील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात प्रगतिशील लेखक संघ, मौर्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलनाचे संविधानाची प्रस्ताविका वाचून उद््घाटन करण्यात आले. या वेळी साहित्यिक डॉ. प्रज्ञा दया पवार, संजय आवटे, कॉ. भालचंद्र कांगो, डॉ. बजरंग बिहारी तिवारी (दिल्ली) उत्तम कांबळे, संजीव कुळकर्णी, महापाैर शैलजा स्वामी आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

केतकर म्हणाले, २०१९ च्या निवडणुकीत भाजपला १८० ते २२० पर्यंत जागा मिळाल्या तरी सत्ता स्थापना शक्य नाही. कारण त्यांची संयुक्त सत्ता चालविण्याची मानसिकता नाही. सध्या हे सरकार चार लोकांवरच चालत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, अजित डोबाल आणि अरुण जेटली यांच्याकडेच सर्व सूत्रे दिसतात. पण कोणत्याही निर्णयाबाबत निश्चित नसतात. 

८ नोव्हेंबर २०१६ ला नोटांबदी करताना काळ्या पैशाला लगाम लावण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतल्याचे सांगितले होते. हळूहळू लक्षात आले की नोटाबंदीचा काळ्या पैशावर काहीच परिणाम झाला नाही. मग त्यालाच उद्देशून कॅशलेससाठी करण्यात आले असे सांगण्यात येऊ लागले. पण नंतर लक्षात आले की, लोकांकडे त्यासाठी ज्ञानच नाही, एटीएममध्ये पैसे नसल्यामुळे लोकांमध्ये नाराजी दिसू लागली, लेसकॅश करत-करत डिजिटल इंडियाकडे गेले. आता जीएसटीवर बोलत आहेत.
बातम्या आणखी आहेत...