आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पद्मावती’वर बंदी घाला; राजपुतांसह हिंदू संघटनांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- संजय लीला भंसाळी द्वारा निर्मित आणि दिग्दर्शित ‘पद्मावती’ चित्रपटाचा वाद आता मंत्रालयात पोहोचला आहे. या चित्रपटात महाराणी पद्मिनी यांचा अपमान केला असून राजपूत संघटनांसह हिंदू संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धाव घेतली आहे. या चित्रपटावर त्वरित बंदी घालावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली असून राज्य सरकार याबाबत सेंसॉर बोर्डाला पत्र लिहणार असल्याची माहिती पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली.  अखंड राजपूताना सेवा संघ, महाराणा बटालियन करणी सेना, अखिल भारतीय क्षत्रिय महासभा, विश्व हिंदू परिषद, हिंदू सेना, राजस्थान राजपूत परिषद, सनातन संस्था आणि बजरंग दलाच्या पदाधिकाकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर प्रतिनिधींनी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपले म्हणणे मांडले.

 
पुढील स्लाइडवर वाचा.. राणी पद्मावती सारख्या महान व चारित्र्यवान नारीस दाखवले दृष्ट खिलजीची प्रेमिका...
बातम्या आणखी आहेत...