आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पासपोर्टसाठी जालनेकरांची मुंबईला पसंती, ऑनलाइन प्रक्रिया स्वस्त असूनही ठरतेय महाग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी पासपोर्ट काढण्यासाठी नागपूर हे मुख्यालय असून येथे जाऊनच ही प्रक्रिया करावी लागत आहे. सध्या यासाठी पाच हजारांचा खर्च होत आहे. नागपूरपेक्षा मुंबईचे पासपोर्ट कार्यालय खर्चाच्या दृष्टीने सोयीस्कर असल्याने "पासपोर्ट काढण्यास नागपूरपेक्षा मुंबईच बरी' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

विदेशात जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पासपोर्ट सेवा ऑनलाइन असली तरी नागपूर येथे जावेच लागते. त्यात काही त्रुटी असल्यास पुन्हा जायचे झाल्यास आर्थिक फटका सहन करावा लागतो. शिवाय प्रवासासाठीही अनेक अडचणी येत आहेत. यामुळे अनेक जण पासपोर्ट काढण्याचे टाळतात. नागपूरला जाण्यासाठी बस, ट्रॅव्हल्स, रेल्वेनेच प्रवास करावा लागतो. प्रवास करताना जाण्या-येण्यातच दोन दिवस जातात.

तसेच काही त्रुटी असल्यास पुन्हा जायचे झाल्यास खर्च वाढतो. यापेक्षा मुंबईचे कार्यालय दिल्यास एका दिवसातच रेल्वेने प्रवास करून सकाळीच पासपोर्टचे काम करून परत एका दिवसात येणे होते. शिवाय खर्चही कमी होतो. पासपोर्टसाठी नांदेड, जालना, परभणी, लातूर, हिंगोली आिण उस्मानाबाद या जिल्ह्यांसाठी नागपूरलाच जावे लागते. आतापर्यंत आॅनलाइनद्वारे जालना जिल्ह्यातून २ हजार ६०० पासपोर्ट काढण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली.

विमानाने प्रवास खडतर नागपूर का नको ?
जालन्याहून नागपूरला ट्रेनने जाणे-येणे केल्यास १ हजार ५० रुपये खर्च होतात, तर बसने १९०० रुपये खर्च करावा लागतो.

मुंबई का हवी?
मुंबईला ट्रेनने जाणे-येणे केल्यास ६०० रुपयांत प्रवास होतो. जालना येथून नंदीग्राम, तर देवगिरी या रेल्वेने गेल्यास आरामही होतो.

मुंबईमुळे त्रास कमी
जिल्ह्यात जास्त उद्योग असल्यामुळे परदेशात जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ होईल. मात्र, पासपोर्टसाठी जालन्यात सुविधा नसल्यामुळे नागपूर परवडत नाही.सुनील रायठठ्ठा, उद्योजक