आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Usmanabad 150 Doctors Resignation News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उस्मानाबादचे 150 डॉक्टर देणार सामूहिक राजीनामे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - शासनाकडून यापूर्वीच मान्य केलेल्या मागण्यांची अंमलबजावणी करण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी न पाळल्यामुळे आता सर्व शासकीय रुग्णालयांतील डॉक्टर्सनी एक जुलै रोजी सामूहिक राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील 150 डॉक्टर सहभागी होणार असल्यामुळे आरोग्य सेवा कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्य शासनाने पूर्वीच मान्य केलेल्या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट अ संघटनेने (मॅग्मो) आता आंदोलनाचा फास आवळण्यास सुरुवात केली आहे. अनेक वर्षांपासून करण्यात येत असलेल्या मागण्या शासनाने मान्य केल्या आहेत. मात्र, त्याच्या अंमलबजावणीकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे संतापलेल्या डॉक्टरांनी एक जूनपासून बेमुदत संप पुकारला होता. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी मागण्यांची 10 दिवसांत अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले होते.