आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्‍मानाबादेत ३० मंडळांनी घेतला गणेश मूर्तीचे विसर्जन न करण्याचा निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
“दिव्य मराठी'ने २२ सप्टेंबर रोजी वृत्त प्रसिध्द करून या अभियानाची सुरुवात केली होती. - Divya Marathi
“दिव्य मराठी'ने २२ सप्टेंबर रोजी वृत्त प्रसिध्द करून या अभियानाची सुरुवात केली होती.
उस्मानाबाद - लोकमान्य टिळकांनी उद्देश घेऊन सुरू झालेला गणेशोत्सव काळानुरूप बदलत गेल्याने या उत्सवावर चौफेर टीका होत असतानाच उस्मानाबादच्या सार्वजनिक गणेश मंडळांनी उद्देश समजून घेत नवा पायंडा पाडला आहे. "दिव्य मराठी'च्या अभियानानंतर शहरातील ३० हून अधिक गणेश मंडळांनी यावर्षीपासून गणेश मूर्तीचे विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला असून, या मूर्ती पुढच्या उत्सवासाठी वापरण्यात येणार आहेत. दरम्यान, हा उपक्रम राज्यासाठी आदर्श ठरेल, असे गौरवोद्गार जिल्हाधिकाऱ्यांसह आमदार, खासदारांनी काढले आहेत.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून होणारे जलप्रदुषण, वायूप्रदुषण टाळण्यासाठी आतापर्यंत अनेक पातळ्यांवर प्रयत्न झाले. त्याला फारसे यश आले नाही. “दिव्य मराठी'ने हा विषय लावून धरला. नगर पालिकेच्या माध्यमातून शहरातील गणेश मंडळांना विसर्जनाचे एकंदर तोटे लक्षात आणून दिले.”दिव्य मराठी'ने आयोजित केलेल्या टॉक शोच्या माध्यमातून या बाबींवर चर्चा घडवून आणली. तसेच हे सांगताना धर्माचा, शास्त्राचा कुठेही अनादर होणार नाही, याचाही विचार करण्यात आला. पुरोहितांनीही विसर्जन करण्याची परंपरा नसल्याचे मंडळांना लक्षात आणून दिले. त्यामुळे शहरातील गणेश मंडळांनी यावर्षीपासून पाण्यात विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला. या मूर्ती वर्षभर पालिकेच्या ताब्यात राहतील. त्यानंतर पुढच्या वर्षी संबंधित मंडळांनी त्या मूर्ती घेऊन जाव्यात, असे आवाहन करण्यात येईल. ज्या मंडळांना मुर्तीचे आदानप्रदान करायचे आहे, त्यांच्यासाठी पर्याय ठेवण्यात येणार आहे.तर ज्यांना पुढच्या वर्षी नवीन मूर्ती खरेदी करायची आहे, त्यांची मूर्ती इच्छूक मंडळांना दान म्हणून देण्यात येणार आहे. काळाची पावले ओळखून उस्मानाबादच्या मंडळांनी परिवर्तनाच्या दिशेने टाकलेले पाऊल म्हणजे खरी गणेश भक्ती आहे, असे मत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केले आहे.