आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षेच्या प्रमाणात उस्मानाबाद अव्वल; दोषसिद्धतेचे प्रमाण १० टक्क्यांच्याही आत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - गुन्ह्याची आकडेवारी वाढत असली तरी त्या तुलनेत दोषसिद्धतेचे प्रमाण १० टक्क्यांच्याही आतमध्येच असल्याने पूर्वी न्यायालयाबरोबरच पोलिस दलाच्याही विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत होते. परंतु, कन्व्हिक्शन सेलच्या स्थापनेपासून उस्मानाबादेत फायदा होताना दिसत असून गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपींना शिक्षेच्या प्रमाणात तिपटीने वाढ झाली आहे. एवढेच नव्हे, तर उस्मानाबाद पोलिस दलाने आैरंगाबाद परिक्षेत्रामध्ये शिक्षेचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रथम क्रमांक मिळवला आहे.   
 
 
सत्र न्यायालयात चालणाऱ्या खटल्यांमध्ये दोषसिद्धतेचे प्रमाण  २०१६ मध्ये दाखल खटल्यांच्या ७.६९ टक्के इतके होते. विविध प्रकरणांत गुन्हे दाखल होत असले तरी तपासातील त्रुटी, संशयाचा फायदा घेऊन गंभीर गुन्ह्यातील आरोपीही सहजरीत्या खटल्यातून निर्दोष सुटत असल्याने पोलिस दलाच्या तपासाबरोबरच न्यायालयीन व्यवस्थेबाबतही नकारात्मक भावना वाढीस लागण्यास या गोष्टी कारणीभूत ठरत होत्या. या पार्श्वभूमीवर पोलिस दलाने योग्य रीतीने तपास होऊन भक्कम व परिपूर्ण दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करण्यासाठी, तपासामध्ये कोणत्याही त्रुटी राहू नयेत यासाठी जून २०१५ मध्ये राज्यभरात कन्व्हिक्शन सेलची स्थापना जिल्हा स्तरावर तसेच आयुक्तालय पातळीवर करण्यात आली. त्यानुसार राज्यात ४७ सेलद्वारे कामकाज सुरू आहे. बहुतांश सेलच्या प्रयत्नामुळे आरोपीला शिक्षेपर्यंत पोहोचवण्याचे प्रमाण वाढले असून उस्मानाबादची प्रगती नेत्रदीपक आहे. या सेलची स्थापना झाल्यानंतर उस्मानाबादचे युनिट सर्वात शेवटच्या क्रमांकावर होते. दोनच वर्षांत पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलिस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली या सेलचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र बनसोडे यांनी यावर विशेष काम करून उस्मानाबाद पोलिस दलाच्या युनिटला राज्यात पहिल्या १० क्रमांकांमध्ये, तर औरंगाबाद परिक्षेत्रात पहिल्या क्रमांकावर नेले आहे. राज्यात दोषसिद्धीचे प्रमाण सर्वाधिक मुंबई शहरचे ३४.२४ टक्के, तर सर्वात कमी मुख्यमंत्र्यांच्या नागपूर रेल्वेचे ० टक्के आहे.  
 
 
बलात्कार, खून, विनयभंगाच्या खटल्यास शिक्षा वाढल्या    
जून २०१५ मध्ये कन्व्हिक्शन सेलची उस्मानाबादेत स्थापना करण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंतचा गुन्ह्यातील निकालाचा आकडा पाहता खून, बलात्कार, बलात्कारासह पोक्सो, पोक्सोसह विनयभंग या खटल्यांमध्ये शिक्षेच्या प्रमाणात वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. यामध्ये पोलिसांकडून दोषारोपपत्र सादर करताना कन्व्हिक्शन सेलकडून होणारे मार्गदर्शन व सहकार्य महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचेही निकालावरून दिसून येते.   
 
 
जूनपूर्वी व जुलै २०१५ नंतरचे खटले, त्यांचे निकाल   
एकूण शिक्षा निर्दोष टक्के   
जून २०१५ ८७ १५ ७२ १७.२४   
जुलै २०१५ नंतर ४४ १७ २७ ३८.६३
बातम्या आणखी आहेत...