आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमबीए करण्याची इच्छा अपुरीच; घरच्या परिस्थितीला कंटाळून त्याने घेतला गळफास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्‍मानाबाद - घरातील हालाखीच्‍या परिस्थितीला कंटाळून लोहारा तालुक्‍यातील एका युवकाने आत्‍महत्‍या केल्‍याची घटना शनिवारी घडली आहे. मनीष नवनाथ कांबळे (वय, 22) असे युवकाचे नाव आहे. बंगळुरुतील नामांकित महाविद्यालयात एमबीएचे शिक्षण घेण्‍याची मनीषची इच्‍छा होती. मात्र घरच्‍या हलाखीच्‍या परिस्थितीमुळे आपले हे स्‍वप्‍न पूर्ण होणार नाही, असा सतत विचार करुन निराश झाल्‍याने राहत्‍या घरी गळफास घेऊन मनिषने आत्‍महत्‍या केली. 
 
मनीष कांबळे याचे बीबीएचे शिक्षण पूर्ण झाले होते. पुढील शिक्षण (एमबीए) बंगळुरुतील नामांकित महाविद्यालयात घेण्याची त्याची इच्छा होती. मात्र घरच्‍या गरीबीमुळे आपण बंगळुरुतील नामांकित महाविद्यालयात एमबीएचे शिक्षण घेऊ शकणार नाही, याचा सतत विचार करुन मनीष निराश झाला होता.
 
अखेर शनिवारी सकाळी 9 च्या सुमारास स्वत:च्या राहत्या घरी पत्र्याला दोरीने गळफास घेवुन त्‍याने आत्महत्या केली. याबाबत मनीषचे भाऊ गणेश नवनाथ कांबळे यांनी दिलेल्या माहितीवरुन लोहारा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युचा गुन्हा नोंदवण्‍यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक सांगवे करीत आहेत.   
बातम्या आणखी आहेत...