आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परतीच्या पावसाने ‘वाघूर’ची जलपातळी वाढवली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- पावसाळ्याचेबदललेले चक्र पाहता यंदा गतवर्षाच्या तुलनेत जेमतेम पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. मात्र, उशिरा का होईना आलेल्या पावसाने वेळ भरून काढली आहे. त्यामुळे जळगावच्या पाच लाख लोकसंख्येला पाणीपुरवठा करणा-या वाघूर धरणात यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत चांगला जलसाठा आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अजून पाऊस सुरू राहिल्यास गतवर्षाच्या तुलनेत यंदा अधिक पाणीसाठा राहण्याची शक्यता आहे.

पाऊस लांबल्याने अनेकांच्या मनात धडकी भरली होती. मात्र, उशिरा आलेल्या पावसाने ही कमी भरून काढली आहे. चार दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. वाघूर धरणाचे पाणलोट क्षेत्र असलेल्या अजिंठा परिसरात पावसाचे प्रमाण समाधानकारक नसले तरीदेखील पहूर, फत्तेपूर कांग नदी परिसरात सुरू असलेल्या पावसाचा फायदा वाघूर धरणाला होत आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर २०१३ची स्थिती पाहता यंदा १७ टक्के पाणीसाठा अधिक आहे. वाघूर धरणातील प्रचंड जलसाठ्यामुळे जळगावकरांना पाण्याची चिंता करण्याची गरज नसल्याची स्थिती आहे. जळगाव शहरासह नेरी आणि सात गावांची तहान भागवणा-या वाघूर धरणात सद्य:स्थितीत ६८.७१ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, यंदा उशिरा पाऊस सुरू झाला असला तरीही गेल्या वर्षाच्या शिल्लक साठ्यात भर पडल्याने सप्टेंबर २०१३च्या तुलनेत सप्टेंबर २०१४ची स्थिती पाहता धरणाची पाणीपातळी मीटर ६०० मिलिमीटरने वाढलेली आहे.

चिंत्ता मिटार-
२३०.२०० मीटर पाणीपातळी
५१.९९ टक्के धरणात शिल्लक साठा
६०० मिलिमीटर जूनपासून पडलेला पाऊस
१३१.८०० मीटर पाणीपातळी
६८.७१ टक्के धरणात शिल्लक साठा
३२० : मिलिमीटर जूनपासून पडलेला पाऊस