आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैद्यनाथ बँकेतील अपहार; 26 जणांवर गुन्हे नोंदवा, परळीच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांचे आदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळी - वैद्यनाथ अर्बन को.ऑप.बँकेच्या व्यवहारात अनियमिततेसह  कोट्यवधी रुपयांचा  अपहार केल्याच्या आरोपावरून बँकेच्या  मागील संचालक मंडळासह  एकूण २६  जणांविरुद्ध गुन्हे दाखल करून चौकशी करावी, असे आदेश परळी न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्या.एम.जे.डवले यांनी गुरुवारी दिले आहेत. 
 
परळी येथील  वैद्यनाथ अर्बन को. बँकेच्या सन २०११  ते २०१६  या कालावधीतील चेअरमनसह सर्व संचालक, बँकेचे लेखापरीक्षक, विधी सल्लागार, मूल्यांकनकार अशा एकूण २६ जणांविरुद्ध कलम १५६ (३) फौजदारी अाचारसंहितेप्रमाणे गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी दाद वैद्यनाथ बँकेचे सभासद सुभाष निर्मळ यांनी अॅड. दिलीप स्वामी यांच्यामार्फत १८ फेब्रुवारी   रोजी अर्जाद्वारे परळी न्यायालयात मागितली होती. या प्रकरणात न्यायालयात सुनावणी होऊन गुरुवारी परळी न्यायालयाने या प्रकरणातील अनियमितता, अपहार कर्ज प्रकरणे आदीबाबत सखोल चौकशी करण्यासाठी परळी शहर पोलिसांना गुन्हें दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती तक्रारदाराचे  वकील दिलीप स्वामी यांनी दिली आहे.
 
बातम्या आणखी आहेत...