आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'वैद्यनाथ'च्या पाठोपाठ पंकजांचा दुसरा विजय, अटीतटींच्या लढतींमुळे बदलाची नांदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील वैद्यनाथ लाेकविकास पॅनलने ११ जागांवर विजय मिळवला. विराेधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या बँक बचाव पॅनलला तीन जागांवर समाधान मानावे लागले. वैद्यनाथ कारखान्याच्या यशानंतर पंकजांचा हा मोठा विजय ठरला. पंकजा मुंडे यांच्याशी आमदार जयदत्त क्षीरसागर व माजी आमदार सुरेश धस यांनी केलेल्या हातमिळवणीचा राष्ट्रवादीला फटका बसला. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन गट समोरासमोर आले. विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार अमरसिंह पंडित, माजी आमदार प्रकाश सोळंके एक, तर दुसरा गट अामदार जयदत्त क्षीरसागर व माजी आमदार सुरेश धस यांचा होता. धस व क्षीरसागर यांनी पंकजांशी हातमिळवणी केली. बँकेचे पूर्वीचे अध्यक्ष राजाभाऊ मुंडे यांचे पुत्र फुलचंद मुंडे विजयी झाले. वैद्यनाथ लोकविकास पॅनलमध्ये महिला प्रतिनिधी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे माजी आमदार सुरेश धस यांच्या पत्नी संगीता धस यांना ८७९ मते मिळून त्या विजयी झाल्या.

अटीतटीचा सामना
>वैद्यनाथ लाेकविकास पॅनलचे सर्जेराव तांदळे यांनी सर्वाधिक मते (९१७) मिळवली. त्यांनी चंद्रकांत चाटे यांचा ६१६ मतांनी पराभव केला.
>नागरी बँक व पतसंस्था मतदारसंघातून निवडून आलेले अादित्य सुभाष सारडा २३ वर्षांचे तरुण संचालक आहेत.
>वैद्यनाथ पॅनलद्वारे सेवा मतदारसंघातून धारूरमधून गाेरख अात्माराम धुमाळ तर बँक बचाव पॅनलचे संगीता गणेश साेळंके यांच्यात अटीतटीची लढत झाली. एका मताच्या फरकाने धुमाळ यांचा विजय झाला. या लढतीकडे धारूर तालुक्याचे लक्ष लागले होते.