आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैजापूर तहसीलमध्ये लाच घेताना लिपिकास पकडले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - अकृषकपरवाना आदेश देण्यासाठी महिलेकडून साठ हजार रुपयांची लाच घेताना येथील तहसील कार्यालयातील लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयात केली. दिलीपसिंह पवार असे लाच स्वीकारताना पकडलेल्या लिपिकाचे नाव आहे.

नाशिक येथील संध्या राहुल आमलेकर यांनी तालुक्यातील टुणकी शिवारात पेट्रोल पंपासाठी कैलास निकम यांची गट क्र. ९९ मधील एकर शेत जमीन भाडेतत्त्वाने घेतली होती. ही शेतजमीन वाणिज्य वापर होणार असल्याने त्यांनी येथील तहसील कार्यालयात सदरील जमीन अकृषिक करण्याचा प्रस्ताव २३ नोव्हेंबर २०१३ रोजी दाखल केला होता.

या प्रस्तावासोबत त्यांनी विविध कार्यालयांची नाहरकत प्रमाणपत्रेही जोडली होती. परवाना मिळण्यासाठी त्यांनी कोशागारात १५ हजार ५८९ रक्कम जमा केली होती. दरम्यान अकृषिक परवाना देण्यासाठी तहसील कार्यालयातील लिपिक दिलीपसिंह पवार हे टाळाटाळ करीत होते. सदरील शेत जमिनीचा परवाना आदेश तयार करूनही तो तक्रारदाराला त्यांनी दिला नव्हता. या आदेशासाठी पवार यांनी साठ हजार रुपयांची लाच आमलेकर यांना मागितली होती.

आमलेकर यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला होता. त्यांच्या तक्रारीनुसार नाशिक येथील ५-६ अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पथकाने गुरुवारी तहसील कार्यालयात सापळा रचून लाचखोर दिलीपसिंह पवार यास लाच घेताना रंगेहाथ पकडले.