आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vaijapur Municipal Office Head News In Divya Marathi

कार्यकाळ संपताच नगराध्यक्षांचा राजीनामा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - नगराध्यक्षा शिल्पा परदेशी यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने नगराध्यक्षांचा पदभार तहसीलदार डॉ. प्रशांत पडघन यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.

राज्य शासनाने नगराध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या पदाला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, याबाबत काही नगरसेवकांनी न्यायालयात धाव घेतल्याने राज्य शासनाने हा निर्णय दोन दिवसांपूर्वी मागे घेतला आहे. हा निर्णय पाच जुलैपर्यंत कार्यान्वित राहील, असा अध्यादेश काढला होता. वैजापूर नगरपालिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक 29 जूनलाच संपली होती. त्यामुळे तहसीलदार डॉ. प्रशांत पडघन यांच्याकडे यांच्याकडे नगराध्यक्षांची निवड होईपर्यंत पदाभार देण्यात आला आहे.

येत्या एक-दोन दिवसांत नवीन नगराध्यक्षांच्या निवडीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी घोषित करण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या शिल्पा परदेशी यांची 29 डिसेंबर 2011 अध्यक्षपदी निवड झाली होती. दरम्यान, पुढील अडीच वर्षांसाठी नगराध्यक्षपद हे खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहे. त्यामुळे नवीन नगराध्यक्ष निवडीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. सध्या काँग्रेस व शिवसेनेकडे प्रत्येकी 9 सदस्य असून राष्ट्रवादीकडे 3 सदस्य आहेत.

नगराध्यक्षपद महिलांसाठी आरक्षित असल्याने राष्ट्रवादीच्या सुरेखा धुमाळ, सेनेच्या सुप्रिया व्यवहारे, शांता राऊत, मंदा त्रिभुवन, सिंधुबाई वाणी, कॉँग्रेसच्या माजी नगराध्यक्षा शिल्पा परदेशी, लता व्यवहारे, अफरोज बेगम, सुनीता जगताप यांच्यापैकी एकीची निवड होऊ शकते. नगराध्यक्षपदाची चावी राष्ट्रवादीच्या हाती असून सत्तेत समान वाटा देणार्‍यांच्या सोबत जाणार आहेत. काँग्रेस व सेनेसह राष्ट्रवादीतील इच्छुकांनी घोडेबाजार सुरू केला आहे. त्या अनुषंगाने पदाधिकार्‍यांच्या मॅरेथॉन बैठकाही झाल्या. सेनेने साथ दिल्यास राष्ट्रवादीही अध्यक्षपदासाठी दावा करण्यास सज्ज झाली आहे.