आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैजापूर तहसीलदारांच्या 55 कार्यालयांना नोटिसा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - तालुक्यातील विविध शासकीय कार्यालये व संस्थांना भाडेपट्ट्याने किंवा कब्जेहक्काने दिलेल्या सरकारी जमिनीच्या वापराबाबत शर्तभंग झाला आहे किंवा कसे याबाबतचा अहवाल मागवण्यासाठी तहसीलदार सुमन मोरे यांनी शहरासह ग्रामीण भागातील ५५ कार्यालयांना नोटिसा बजावल्या आहेत. संबंधित कार्यालयाच्या प्रमुखाने स्थळपाहणी करून अहवाल सात दिवसांत सादर करावा असे नोटिशीत म्हटले आहे.
 
मुंबई उच्च न्यायालयात संजीव पुनलेकर यांनी महाराष्ट्र शासनाविरुद्ध दाखल केलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान शासनाने कोर्टात दाखल केलेल्या शपथपत्राप्रमाणे कार्यवाही करण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
 
यांना बजावल्या नोटिसा  
नगर परिषद वैजापूर, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे वसतिगृह, जिल्हा उद्योग केंद्र शिऊर, संचालक कोशागार वैजापूर, भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्था, ग्रामपंचायत लासूरगाव, पोलिस अधीक्षक औरंगाबाद, तालुका भूमी अभिलेख कार्यालय वैजापूर, जिल्हा परिषद प्रशाला वैजापूर, डीएड कॉलेज वैजापूर, न्यू हायस्कूल वैजापूर, विनायक सहकारी साखर कारखाना वैजापूर, कृषी उत्पन्न बाजार समिती वैजापूर, प्राथमिक शाळा भायगाव गंगा, लाखणी, पाथ्री, सेंट मोनिका इंग्लिश स्कूल, शंकर स्वामी औद्योगिक वसाहत शिऊर, सहायक अभियंता महावितरण चांदेगाव, सहायक अभियंता गारज, मुस्लिम समाज दफनभूमी म्हस्की, पंचायत समिती वैजापूर, एसटी महामंडळ वैजापूर, हुतात्मा स्मारक वैजापूर, वसंत क्लब वैजापूर, आरोग्य विभाग वैजापूर, महावितरण कार्यालय वैजापूर, प्राथमिक आरोग्य केंद्र भोकरगाव, महालक्ष्मी मागासवर्गीय महिला सहकारी संस्था शिऊर, दुय्यम निबंधक वैजापूर, ग्रामपंचायत साकेगाव, महावितरण कार्यालय खंबाळा, भायगाव गंगा, गोळवाडी.
 
बातम्या आणखी आहेत...