आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळी मराठवाड्यावर अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा शिडकावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - शहरासह जिल्ह्यातील गेवराई, अाष्टी, शिरूर, धारूर, परळी, केज, पाटाेदा अादी तालुक्यांमध्ये सोमवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. गेवराई, शिरूर, पाटोदा, आष्टी, वडवणी तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस झाला, तर बीड शहरात दुपारी तीनपासून टप्प्याटप्याने बऱ्यापैकी हजेरी लावली. दोन दिवसांपासून जिल्हाभरात ढगाळ वातावरण असल्याने वातावरणात थोडी उष्णता होती. रविवारी रात्री बीड शहरात थोडी तर केज, शिरूर परिसरात पावसाने चांगली हजेरी लावली. सोमवारीही दुपारी तीन नंतर शहरात आणि शिरूर, पाटोदा, आष्टी, वडवणी, गेवराई तालुक्यातील मादळमोही परिसरात हजेरी लावल्याने वातावरणात चांगला गारवा जाणवला. अाष्टीमध्ये ५ मिमी पावसाची नाेंद झाली अाहे. सकाळी थंडी व सायंकाळी पाऊस अशा वातावरणाचा अनुभव सध्या बीडकर घेत आहेत. दरम्यान, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सायंकाळी पावसाने हजेरी लावल्याने चाकरमान्यांची धांदल उडाल्याचे चित्र पाहवयास मिळाले.
लातुरात हलका पाऊस
लातूर शहर आणि परिसरात सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता पावसाच्या हलक्या सरी पडल्या. दोन दिवसांच्या ढगाळ वातावरणानंतर सोमवारी सकाळपासूनच लातूरमध्ये कडक ऊन पडले होते. सायंकाळी पाच वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता होती. त्यानंतर मात्र वातावरण ढगाळ झाले. साडेसात वाजता सुमारास हलक्यासरीचा पाऊस पडला.
उस्मानाबादेतही सरी
उस्मानाबाद शहरातील काही भागात सोमवारी रात्री हलक्या स्वरूपाचा तर तालुक्यातील ढोकी, पळसप भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. दोन दिवसांपासून ढगाळ हवामानामुळे जिल्ह्याला पावसाची अपेक्षा आहे. रविवारीही काही प्रमाणात पाऊस झाला. सोमवारी पळसप, ढोकी परिसरात पाऊण तास मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.