आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Very Soon Industrial Area Sanction To Tuljapur Narayan Rane

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या औद्योगिक वसाहतीला लवकरच मंजुरी - उद्योगमंत्री नारायण राणे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर - तुळजापूरच्या औद्योगिक वसाहतीला लवकरच मंजुरी देण्यात येईल, वसाहतीच्या भूमिपूजनाला स्वत: येणार, शहराच्या विकासाला निधीची अडचण भासू देणार नाही, अशी ग्वाही उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दिली.


उद्योगमंत्री राणे यांनी तुळजाभवानी मातेचे रविवारी सहकुटुंब दर्शन घेतले. त्यानंतर मंदिर संस्थानच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री मधुकरराव चव्हाण, जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. के. एम. नागरगोजे, नगराध्यक्षा विद्या गंगणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब पाटील यांची उपस्थिती होती.
उद्योगमंत्री राणे पुढे म्हणाले की, राज्याचा विकास केवळ काँग्रेस आणि राष्‍ट्रवादी काँग्रेसचे आघाडी सरकारच करू शकते. सत्तेबाहेर असल्यामुळे विरोधक तडफडत आहेत. त्यामुळे टीका करण्याचा उद्योग त्यांनी सुरू केला आहे. औद्योगिक वसाहत ही तुळजापूरची गरज आहे. याला तत्काळ मंजुरी देण्यात येईल. नागरिकांनी जमिनी उपलब्ध करून द्याव्यात. तुळजापूर विकास प्राधिकरण व अन्य योजनांमार्फत सुरू असलेली कामे तातडीने पूर्ण करण्यात येतील. 325 कोटी रुपये खर्चून विकासकामे, बाह्यवळण रस्ता, रामदरा साठवण तलाव आदी कामे झाली आहेत, तर काही प्रगतिपथावर आहेत. ही कामे करण्याची धमक केवळ आघाडी शासनामध्येच आहे. या वेळी पालकमंत्री चव्हाण यांनी शहरात सुरू असलेल्या विकासकामांची सविस्तर माहिती दिली.


जिल्हाधिका-यांकडून घेतली माहिती
जिल्हाधिकारी डॉ. नागरगोजे यांनी उद्योगमंत्री राणे यांच्यासोबत चर्चा केली. सध्या तुळजापूर विकास प्राधिकरण व अन्य योजनांच्या माध्यमातून विकासाची करण्यात येत असलेली कामे, पूर्ण झालेली कामे व प्रस्तावित असलेल्या कामांची माहिती लॅपटॉपवर डॉ. नागरगोजे यांनी राणे यांना सांगितली. राणे यांनीही आस्थेवाईकपणे चौकशी करून माहिती घेतली.
खणानारळाने ओटी
नारायण राणे त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र खासदार नीलेश राणे, स्वाभिमानी संघटनेचे नितेश राणे, नीलम राणे, प्रियंका राणे, नंदिता राणे आदी कुटुंबीय या वेळी उपस्थित होते. सुरुवातीला मंदिरात कुटुंबीयांनी यथोचित पूजन केले. विलास छत्रे यांनी पूजेदरम्यान पौरोहित्य केले. कुटुंबीयांनी देवीची खणानारळाने ओटी भरून साडीचोळी अर्पण केली.