आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vice President Of China Scheduled To Visit Ajanta Caves

चीनचे उपराष्ट्रपती आज देणार अजिंठा लेणीस भेट, पर्यटकांना प्रवेश नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फर्दापूर, अजिंठा - चीनचे उपराष्ट्रपती ली युअांचो बुधवारी (४ नोव्हेंबर) अजिंठा लेणीत येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर लेणी परिसरात ९६८ कर्मचारी व १०३ पोलिस अधिकारी बंदोबस्तासाठी सज्ज झाले आहेत. यानिमित्त एसपी नवीनचंद्र रेड्डी यांनी मंगळवारी पोलिसांचे परेड संचलन घेतले.

औरंगाबाद ते अजिंठा लेणी १०० किमी अंतर आहे. त्यामुळे जागोजागी कोणी कसे बंदोबस्ताला राहावे, याची चाचपणी मंगळवारी घेतली. उपराष्ट्रपती अजिंठा लेणी पाहतेवेळी सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना लेणी पाहता येणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

जगातील सर्वात वेगाने प्रगती करणारा व सर्वात मोठा देश चीनचे उपराष्ट्रपती ली युआंचो हे प्रथमच अजिंठा लेणी पाहायला बुधवारी येणार आहेत. उपराष्ट्रपती येणार म्हणून पोलिस प्रशासन सज्ज झाले.

एसपी नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त पॉइंट फिक्स करण्यात आले. उपराष्ट्रपती जवळपास सकाळी ९ वाजता लेणीत येणार आहेत. ते लेणी पाहणार असल्याने दीड-दोन तास पर्यटकांना बाहेरच ताटकळत बसावे लागणार आहे. एसपी नवीनचंद्र रेड्डींनी लेणीची पाहणी केली असता अजिंठा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शंकर शिंदे यांनी त्यांना बंदोबस्ताबद्दल माहिती दिली.

व्ह्यू पाॅइंट मार्ग बंद’
पिंपळदरी येथील ह्यू पाॅइंट मार्गावरून अजिंठा लेणीत पायऱ्यांनी उतरता येते. अनेक पर्यटक तो पाॅइंट बघून तिथूनच लेणीत प्रवेश करतात. उपराष्ट्रपती या पाॅइंटला भेट देणार आहेत. तेथून पायरी मार्ग मंगळवारपासून बंद करण्यात आले. तिथेही तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला.

असा असेल बंदोबस्त
९६८ कर्मचारी, १०३ पोलिस अधिकारी, बाॅम्बशोधक पथक, फायर ब्रिगेड, अॅम्ब्युलन्स हे सगळे उपराष्ट्रपतींच्या बंदोबस्तासाठी सज्ज झाले आहेत.

भेटीचे कारण
लेणीला भेट देऊन पाहणी करणार आहेत. लेणीपर्यंत मार्ग, तसेच लेणी परिसरातील सोयी-सुविधांबद्दल निधी देण्याचे जाहीर करणार आहेत. जगप्रसिद्ध अजिंठा लेणीसारखीच चीनमध्येही ऐतिहासिक लेणी असल्याने सांस्कृतिक देवाणघेवाण जोपासण्यासाठी ते अजिंठा लेणीच्या सुशोभीकरणासाठी निधी जाहीर करणार आहेत.