आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vilasrao Deshmukh Sahitya Sammelan Prorgam At Latur In December

विलासराव देशमुख स्मृती साहित्य संमेलनात सहभागी होण्याचे संयोजकांचे आवाहन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - जिल्ह्याचे सुपुत्र आणि देशाचे लाडके नेते विलासराव देशमुख एक उमदे राजकारणी असले तरी साहित्य आणि संस्कृतीमध्ये रमणारा दिलदार रसिक राजकारणी ही देखील त्यांची ओळख होती. त्यांचा राजकीय जीवनप्रवास आणि त्यांच्या आठवणीना उजाळा देण्यासाठी दि.20,21 व 22 डिसेंबर 2013 दरम्यान लोकनायक विलासराव देशमुख स्मृती साहित्य संमेलन, उदगीर येथे आयोजित करण्यात येणार आहे. या संमेलनासाठी अनेक मान्यवर नेते, साहित्यिक, लेखक, कवी, सिने व नाट्य कलावंत आणि विविध मान्यवरांना निमंत्रित करण्यात येणार असल्याचे आयोजकांकडून कळविण्यात आले आहे. तीन दिवस चालणा-या या संमेलनात परिसंवाद, चर्चासत्र, व्याख्यान, निमंत्रित व नवोदित कवींचे कविसंमेलन अशी भरगच्च कार्यक्रमाची मेजवानी साहित्य रसिकांसाठी असणार आहे.

यासोबतच दिवंगत विलासराव देशमुख यांच्या जीवनपट मांडणारे चित्रप्रदर्शन असणार आहे. ग्रंथदिंडीने सुरवात होणा-या संमेलनात विलासरावांच्या आयुष्यावर अनेक मान्यवर प्रकाश टाकणार आहेत. तसेच स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे. या साहित्य संमेलनात सहभाग नोंदविण्यासाठी संयोजक विनोद मिंचे यांच्याशी 9420121012 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा vinodminche@gamil.com येथे आपला सहभाग, सूचना नोंदवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.