आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vilasrao Deshmukh Third Memory Day Crowd Of People

विलासरावांच्या समाधिस्थळी श्रध्देपोटी जनसागर लोटला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - लातूरला विकासाच्या महामार्गावर घेऊन जाणारे ‘लोकनेते’ अशी नागरिकांकरवी उपाधी मिळालेल्या विलासराव देशमुख यांच्या आठवणी त्यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त लातूरकरांत शुक्रवारी पुन्हा जागल्या. बाभळगाव येथील विलासबागेतील विलासरावांच्या स्मृतिस्थळांवर त्यांच्या कुटुंबीयांसह हजारो नागरिकांनी या लोकनेत्याला आदरांजली वाहिली.
प्रारंभी विलासरावांच्या पत्नी वैशालीताई यांनी पुष्प अर्पण केले. धाकटे बंधू आमदार दिलीपराव, त्यांच्या पत्नी सुवर्णाताई, विलासरावांचे पुत्र आमदार अमित, रितेश, धीरज व स्नूषा अदिती, जेनेलिया, दीपशिखा, नातू अवीर, अवान व वंश यांनीही आदरांजली वाहिली. याशिवाय आमदार त्र्यंबक भिसे, त्र्यंबकदास झंवर, महापौर अख्तर शेख, झेडपीच्या अध्यक्षा प्रतिभा पाटील कव्हेकर, जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, पोलिस अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्यासह अधिकारी व नागरिकांनी श्रद्धांजली वाहिली. विलासरावांच्या कर्तृत्वाची महती सांगणारा योगिराज माने यांच्या गझलांचा कार्यक्रम समाधिस्थळी झाला.