आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपने विनायक मेटेंना डावलले, राज्यात मराठा नेतृत्वाची कोंडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - युती सरकार मंत्रिमंडळाच्या विस्तारात घटक पक्षातील शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यांना एेनवेळी मंत्रिपदासाठी भाजपने डावलले आहे. बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधामुळे मेटे यांना मंत्रिपदाला मुकावे लागल्याची जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे. भाजपकडून मराठा नेतृत्वाची कोंडी केली जात असल्याने १६ जुलै रोजी मुंबईत शिवसंग्रामच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत कार्यकर्त्यांशी चर्चा करून युतीबरोबर राहायचे की नाही, याचा निर्णय मेटे हे घेणार आहेत.

मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना साथ देत शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी राज्यातील सर्व घटक पक्षांची मोट बांधत महायुती केली होती. ही महायुती करताना मेटे यांची विधान परिषदेची राष्ट्रवादीकडील आमदारकी गेली होती. बीड विधानसभा मतदारसंघात भाजपच्या चिन्हावर मेटेंनी निवडणूक लढवली खरी; परंतु त्यांचा पराजय झाला होता. युतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर पंकजा मुंडे यांची ग्रामविकासमंत्रिपदी वर्णी लागली. मेटे यांच्या पदरात काहीच पडले नाही. जिल्ह्यात मंत्री पंकजा मुंडे व आमदार मेटे यांच्यात मतभेद निर्माण होऊ लागले. मेटे हे बीडमध्ये पक्षाच्या व आपल्या विरोधात काम करत असल्याची तक्रार मंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली होती. दरम्यानच्या काळात बीडमध्ये शिवसंग्रामचे युवा प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या पालवण येथील छावणीत सामुदायिक विवाह साेहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. पुढे मेटे यांची विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड झाली. शिवसंग्रामचे वाढते वर्चस्व बीडमध्ये भाजपबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेससाठी त्रासदायक ठरू लागले. विस्तारात मंत्री म्हणून आमदार मेटे यांची निवड होणार असल्याचे निश्चित झाले होते, परंतु पालकमंत्र्यांच्या विरोधामुळे मेटेंचे मंत्रिपद हुकल्याची चर्चा सुरू आहे.

कार्यकर्ते मुंबईत; शपथविधीला दांडी
शुक्रवारी विधान भवनात विधान परिषदेच्या आमदारांचा शपथविधी हाेता; परंतु मंत्रिपदी वर्णी न लागल्याने आमदार विनायक मेटे हे शपथविधीला गेले नाहीत. त्यामुळे बीडहून मुंबईत गेलेल्या सुमारे तीनशे कार्यकर्त्यांत नाराजी पसरली. आता १६ जुलै २०१६ रोजी मुंबईत शिवसंग्रामच्या राज्य कार्यकारिणीची बैठक होणार असून युतीबरोबर राहायचे की नाही हे आमदार मेटे कार्यकर्त्यांशी चर्चा करून ठरवणार आहेत.
मित्रपक्ष भाजपने दगा दिला
मंत्रिमंडळात कुणाला घ्यायचं, हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. परंतु मित्रपक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवताना भाजपने जो काही शब्द दिला होता, तो शब्दच पाळला नाही. मराठा समाजाचा विचार न करता भाजपने दगाफटका केला आहे.
विनायक मेटे, आमदार, शिवसंग्राम
पुढे वाचा, निलंगेकरांना का मिळाले मंत्रिपद...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...