आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षणमंत्री म्हणाले, मलाही बीडच्या शाळेत प्रवेश घ्यावा लागेल !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - थर्टी फर्स्ट साजरा करता मी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात तुमच्याबरोबर करण्यासाठी बीडला आलो आहे, असे म्हणत कॉपीमुक्ती महारॅलीच्या निमित्ताने बीड शहरातील राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवाच्या सभामंडपात आलेल्या विद्यार्थ्यांत जाऊन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी प्रश्नोत्तराचा तास घेतला. विद्यार्थ्यांनी त्याला प्रतिसाद देत प्रश्न विचारून शिक्षणमंत्र्यांना भंडावून सोडले असता विद्यार्थ्यांचे चातुर्य बघून तावडे म्हणाले, आता मलाही बीडच्या शाळेत प्रवेश घ्यावा लागेल.

बीड शहरातील स्व. झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने शुक्रवारी कॉपीमुक्त शिक्षणासाठी महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते. राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवाच्या मंडपात मंचावरून बोलण्यापेक्षा शिक्षणमंत्री विनोद तावडे थेट विद्यार्थ्यांत गेले. बिनधास्तपणे प्रश्न विचारा, असे आवाहन त्यांनी केले.

आठवीपर्यंत परीक्षा घ्यायची की नाही, असा प्रश्न तावडेंनी विचारला तेव्हा सर्वच मुलांनी हात वर करत होकार िदला. मुलांनो, तुम्ही इतर जिल्ह्यांतील मुलांना सांगा कॉपी बंद करा. या वेळी तावडे यांनी मुलांना एका टोपी विकणाऱ्या विक्रेत्याची गोष्ट सांगत कॉपी करणारा कोण असतो हे पटवून दिले. माकडही कॉपी करत नाही. मग तुम्ही कशासाठी कॉपी करता, असा प्रश्न त्यांनी केला. प्रतीक्षा रमेश जाजू या विद्यार्थिनीने तावडे यांना प्रश्न विचारला की, बीड जिल्ह्याला राज्यात मागास समजले जाते. अभ्यासक्रमात तुम्ही बदल करणार का? तेव्हा तावडे यांनी उत्तर देताना सांगितले की, बीडची मुले मागासलेली आहेत असे मला वाटत नाही. या मातीत राजकीय, सामाजिक नेते होऊन गेले. दुष्काळी परिस्थिती ऊसतोड कामगार या दोन कारणामुळे मुलांना शेतात काम करावे लागते. येणाऱ्या काळात निश्चितपणे बीडची मुले राज्यात हुशार असतील, असे ते म्हणाले.

पेशावरच्या आर्मी स्कूलला पत्र दहशतवाद्यांच्याहल्ल्यात १६२ मुले ठार झाली तो देश कोणता? ते शहर कोणते ? अशी माहिती विचारताच मुलांनी पाकिस्तान, पेशावर, आर्मी स्कूल अशी उत्तरे दिली. पेशावरच्या आर्मी स्कूलला जिल्ह्यातील प्रत्येक शाळेने पत्र पाठवून आम्हीही तुमच्या दु:खात सहभागी आहोत, असे लिहा, असे तावडेंनी सांगितले.

शाळेत जाणाऱ्या मुलींचा सर्व्हे करणार : राज्यातील४१ हजार गावांत कुठल्या शाळेत विद्यार्थिनी जात नाहीत. त्याची कारणे काय आहेत याचा शिक्षण विभाग आढावा घेणार असून सहा वर्षे वय असलेल्या मुली जर शाळेत जात नसतील तर याचाही अहवाल मागवला जाईल, असेही ते म्हणाले.

कृषी घटकाचा समावेश विचाराधीन शशांकपंगुडवाले याने दहावीच्या मुलांना कौशल्य शिक्षण अभ्यासक्रम कधी सुरू करणार, असा प्रश्न विचारला तेव्हा दहावीपेक्षा आठवीपासूनच कौशल्य प्रशिक्षण सुरू करण्याचा आमचा विचार आहे, असे उत्तर तावडे यांनी दिले.