आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपरी येथे हिवतापाची साथ; गावात 30 वर रुग्ण आढळले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संग्रहित छायाचित्र - Divya Marathi
संग्रहित छायाचित्र
हिंगोली- सेनगाव तालुक्यातील गुगुळ पिंपरी येथे गेल्या ८ दिवसांपासून हिवतापाची साथ पसरली असून आतापर्यंत ३० पेक्षा अधिक रुग्ण आढळले असून जिल्हा आरोग्य विभागाने लक्ष घातल्याने साथ आटोक्यात आली आहे.  

 प्राथमिक आरोग्य केंद्र गोरेगावअंतर्गत गुगुळ पिंपरी येथे आरोग्य पथकाने भेट दिली असता संपूर्ण गावात कीटकशास्त्रीय सर्वेक्षण करण्यात आले. गावात हाऊस इंडेक्सचे प्रमाण वाढलेले आढळले असून गावातील संपूर्ण पाणी साठवण स्थळात अॅबेट औषध टाकण्यात आले.  तसेच १५ घरांतील साठवण टाक्या रिकाम्या करण्यात आल्या. गावातील आजूबाजूच्या साचलेल्या गटारांमध्ये जळके ऑइल टाकण्यात आले आहे. सध्या गावात असलेल्या  तापाच्या रुग्णांची तपासणी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गजानन चव्हाण व  वैद्यकीय अधिकारी डॉ. एस.के. माखणे यांनी केली.  माहेश्वरी प्रकाश खोडे (११), आकाश रामचंद्र तायडे (१२), वेदांत गजानन खोडे (६), श्रावणी विलास साळवे (१२), विशाल मदन पोहकर (१३), विवेक गणेश खुडे (१३) आणि महादेव दत्तराव तायडे (५५) या पाच रुग्णांना गावातील आरोग्य छावणीत डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. इतर रुग्णांना उपचार करून घरी पाठवण्यात आले आहे.  देखरेखीखाली असलेल्या रुग्णांचे रक्तजल नमुने घेण्यात आले असून हे नमुने  वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे तपासणीकरिता पाठविण्यात आले. 
बातम्या आणखी आहेत...