आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Vishnupuri Dam Water Level Increases One Percent

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विष्णुपुरीच्या जलसाठ्यात जुजबी बाढ, नांदेडवर पाणीटंचाईचे संकट कायम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - मराठवाड्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे विष्णुपुरी जलाशयाच्या साठ्यात केवळ एक टक्का वाढ झाली. विष्णुपुरी बंधार्‍यात पाण्याचा साठा ७.४४ दलघमी होता. पावसामुळे त्यात वाढ होऊन तो आता ८.२२ दलघमीपर्यंत झाला आहे. शहराला याच बंधार्‍यातून पाणीपुरवठा होतो. जलसाठा कमी असल्याने सध्या शहराला दर चार दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. जलसाठ्यात चांगली वाढ झाली नाही तर शहरातील पाणीपुरवठ्याची समस्या भविष्यात अजून बिकट होण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या पावसाने शहराला फार मोठा दिलासा मिळाला नाही.