आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विष्णुपुरी प्रकल्पाला दिग्रस बंधार्‍यातून पाणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - नांदेडसह दहा गावांची तहान भागवण्यासाठी दिग्रस उच्च पातळी बंधार्‍याच्या लाभक्षेत्राची गरज भागल्यानंतर शिल्लक राहणार्‍या साठय़ापैकी पाच दशलक्ष घनमीटर पाणी विष्णुपुरी बंधार्‍यात सोडण्याची सूचना राज्याचे अपर मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी गुरुवारी घेतलेल्या आढावा बैठकीत जलसंपदा विभागाला केली.

स्वाधीन क्षत्रिय यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभागप्रमुखांची बैठक झाली. या वेळी जिल्हाधिकारी धीरजकुमार, मनपा आयुक्त जी. र्शीकांत, सीईओ सुमंत भांगे, जलसंपदाचे कार्यकारी अभियंता सूर्यकांत कवळीकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकारी व सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सूर्यकांत कवळीकर यांनी विष्णुपुरी प्रकल्पातील उपलब्ध जलसाठय़ाची माहिती दिली. जलाशयात सध्या 27 दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. लाभक्षेत्रातील सिंचन क्षेत्राचा वापर पूर्णपणे बंद करण्यात आला असल्याचे नमूद केले. नांदेड शहरासह दहा गावांच्या पाणीपुरवठा योजना या जलाशयाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. त्यांची मागणी लक्षात घेतली तर विद्यमान जलसाठय़ातून पिण्यासाठी लागणार्‍या पाण्याची गरज पूर्ण होणार नाही.
त्यासाठी विष्णुपुरी प्रकल्पाच्या वरील बाजूस असलेल्या दिग्रस (जि. परभणी) उच्च पातळी बंधार्‍यातून पाणी मिळणे अत्यंत अपरिहार्य आहे. दिग्रस बंधार्‍याची जल साठवण क्षमता 63.850 दलघमी असून सध्या 26.630 दलघमी पाणी बंधार्‍यात उपलब्ध आहे. हा प्रकल्प बांधतानाच त्यातील काही पाणी विष्णुपुरी प्रकल्पासाठी देण्याची अट टाकण्यात आली आहे.