आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • VJNT Commission Members Visit At Hingoli District

व्हीजेएनटी आयोगाचे राठोड यांनी जाणल्या अडचणी, केली विचारपूस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली- विमुक्त जाती, भटक्या जमाती राष्ट्रीय आयोगाचे सदस्य श्रवणसिंग राठोड यांनी मंगळवारी जिल्ह्यातील तीन गावांना भेटी देऊन समाजबांधवांच्या अडचणी जाणून घेतल्या. अास्थेवाइकपणे ग्रामस्थांची विचारणा करून राठोड यांनी आपले दुपारचे भोजन एका गरीब हटकर कुटुंबाच्या झोपडीत करून ग्रामस्थांना आश्चर्याचा धक्का दिला.

श्रवणसिंग राठोड हे सोमवारी रात्री हिंगोलीत दाखल झाले. आज सकाळीच त्यांनी तालुक्यातील कळमकोंडा टाकळी या गावांना भेटी दिल्या. कळमकोंडा येथे त्यांनी धनगर समाजाला मिळालेल्या सरकारी योजनांची माहिती घेऊन त्यांच्याशी रोजगाराबाबत चर्चाही केली. मुले काय करतात, काम किती तास करता, पिके कशी आहेत, उत्पन्न किती झाले आदी माहिती त्यांनी या गावात घेतली.

११.३० वाजेच्या सुमारास बेंगाळ नावाच्या कुटुंबाकडे स्वयंपाक चालू असल्याचे दिसताच, त्यांनी त्याच ठिकाणी गरम चपाती भरतावर ताव मारला. त्यानंतर राठोड यांनी टाकळी येथे भेट दिली. त्यानंतर त्यांनी भटसावंगी तांडा येथे दुपारी च्या सुमारास भेट देऊन बंजारा बांधवांसोबत तास घालविला. या दौऱ्याचा हेतू भटक्या जाती, विमुक्त जमातीच्या अडीअडचणी जाणून घेणे हा हेतू होता. हा केवळ अभ्यासदौरा असल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. राठोड यांनी सकाळी विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या प्रतिनिधींसह एनजीओ चालकांसोबतही चर्चा करून सरकारी योजना कशा असाव्यात यावर चर्चा करून त्यांचे अभिप्राय घेतले. दौऱ्यादरम्यान त्यांच्यासोबत विशेष समाजकल्याण अधिकारी छाया कुलाल, झेडपीचे समाजकल्याण अधिकारी ए.ए. कुंभारगावे, समाजकल्याणचे ए.एन. वागतकर, अशोक चव्हाण, अॅड. सीताराम राठोड, डॉ. रमेश मस्के आदी उपस्थित होते.