आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मतदारांना पैसे वाटतानाचा व्हिडिओ व्हायरल; वडवणी ठाण्यात दोन्ही पॅनलकडून तक्रारी दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडवणी - तालुक्यातील उपळीजवळील सावंत वस्तीवर मंगळवारी प्रचारासाठी गेलेल्या काही महिला व पुरुषांनी मतदारांना पैसे वाटल्याचा  व्हिडिओ  सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. या प्रकरणी वडवणी पोलिस ठाण्यात दोन्ही पॅनलच्या प्रमुखांनी परस्पराविरोधी तक्रारी दिल्या आहेत.

तालुक्यातील  सावंत वस्तीवर मंगळवारी दुपारी जनविकास आघाडी पॅनलच्या काही महिला प्रचारासाठी गेल्या.   त्यांच्या सोबत वाहनचालकही होता. त्याचवेळी  स्वाभिमानी ग्रामविकास अाघाडीच्या काही कार्यकर्तेही तेथे गेले होते. या वस्तीवर काही महिला व पुरुषांना पैसे वाटप करण्यात आल्याचा व्हिडिओ बुधवारी  व्हायरल झाला.   
कोणी कोणाला पैसे वाटले ?

वडवणी तालुक्यातील सावंत वस्तीवर नेमक्या  कोणत्या  पॅनलच्या लोकांनी पैसे काढले, कोणाला दिले हे व्हिडिओ पाहिल्यानंतर  लक्षात येत नाही.

त्यांनी त्यांच्याच लोकांना पैसे वाटले.
सावंत वस्तीवर प्रचारासाठी गेलेल्या आमच्या स्वाभिमानी ग्रामविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटप  करत असल्याचा हा प्रकार दिसला. म्हणून आमच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक विभागाकडे तक्रार केली.  
- अॅड.प्रदीप शेळके, स्वाभिमानी, ग्रामविकास अाघाडी उपळी.

त्यांनी कांगावा केला
आमच्या काही महिला बुधवारी त्या वस्तीवर प्रचारासाठी गेल्या होत्या. हे विरोधी पॅनलचे लोक धावतच तेथे पोहोचले. आमच्या महिलांनी  प्रचार करू नये, अशी दमदाटी करून त्यांनी महिलांना धक्काबुक्की केली. त्यांच्या लोकांनी महिलांचे हात धरले व पैसे वाटल्याचा कांगावा केला. व्हिडिओ क्लिप तयार करून त्यांनीच व्हायरल केली आहे. 
 
- शेख शायक,सरपंच उपळी, जनविकास आघाडी उपळी.
बातम्या आणखी आहेत...