आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड महापालिकेसाठी 11 ऑक्टोबरला मतदान; आजपासून आचारसंहिता लागू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/औरंगाबाद- नांदेड-वाघाळा महापालिकेच्या सार्वत्रिक, तसेच बृहन्मुंबई, पुणे आणि नागपूर महानगरपालिकेच्या प्रत्येकी एका आणि कोल्हापूर महापालिकेच्या दोन रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 11 ऑक्टोबर 2017 रोजी मतदान होणार आहे. 12 ऑक्टोबर 2017 रोजी मतमोजणी होईल.
 
निवडणुकांसाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी केली. नांदेड-वाघाळा महापालिकेची मुदत 31 ऑक्टोबर 2017 रोजी संपत आहे. शहराची एकूण लोकसंख्या 5 लाख 50 हजार 439 असून सुमारे 3 लाख 96 हजार 580 मतदार आहेत. एकूण 20 प्रभागांतील 81 जागांसाठी मतदान होणार आहे. त्यापैकी 41 जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जातींसाठी 15, अनुसूचित जमातींसाठी 2; तर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 22 जागा राखीव आहेत.
 
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग क्र. ‘116’, पुण्यातील  प्रभाग क्र. ‘21अ’ नागपूरमधील प्रभाग क्र. ‘35-अ’ आणि कोल्हापूरमधील प्रभाग क्र. ‘11’ व ‘77’ च्या रिक्तपदांच्या पोट निवडणुकांसाठीदेखील मतदान होत आहे.
 
या सर्व ठिकाणी 16 सप्टेंबर 2017 पासून नामनिर्देशनपत्रं दाखल करण्यास सुरुवात होईल. 11 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल.
नांदेड-वाघाळा महानगरपालिका आणि पोटनिवडणूक होत असलेल्या अन्य महानगरपालिकांच्या संबंधित प्रभागात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर ती संपुष्टात येईल. मतमोजणी 12 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 10 वाजता सुरु होईल.
बातम्या आणखी आहेत...