आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेटरकडून ‘टिप’ची रक्कम दुष्काळग्रस्तांना, बीडमधील युवकाचे काैतुकास्पद कार्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - प्रसंग अाहे बीड जिल्हाधिकारी कार्यालयावरचा... पुढारी अाणि सर्वसामान्य माणूस यांच्यातील स्वभाव, गुणवैशिष्ट्ये अाणि संवेदनशील मनाचे दर्शन घडवणारा... विराेधकांवर चाल करून जाण्यासाठी शाेधलेल्या पर्यायातून जिल्हाधिकारी कार्यालय गाठलेले पुढारी एकीकडे तर संवेदनशील मन असलेला अाणि हाॅटेलमध्ये वेटरचे काम करून शिक्षण घेत असताना ग्राहकांकडून ‘टिप’ म्हणून मिळालेली रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीस देण्यासाठी अालेला विद्यार्थी..! सत्पात्री दान अाणि दाता, हे साेमवारी बीडकरांना पाहायला मिळाले.
साेमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर बीड नगरपालिका बरखास्त करण्यासाठी माेठा माेर्चा काढण्यात अाला. अाराेप, निषेधाच्या घाेषणांनी जिल्हा कचेरीचा परिसर दणाणून गेला हाेता. माेठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शनही झाले. या अांदाेलनाच्या गर्दीतून वाट काढत एका ऊसताेड मजुराच्या मुलाने जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. सूरज राधाकिसन उफाडे (रा. नाकलगाव, ता. माजलगाव) असे त्याचे नाव. बारावीत शिकताे, सोबत गरज म्हणून हाॅटेलमध्ये वेटरचे काम करतो. तेथे ग्राहकांकडून टिपमधील मिळालेली पै न पै जमा करून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत म्हणून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात अाला हाेता. त्याची धडपड हाेती ती वाट काढत जिल्हाधिकारी नवलकिशाेर राम यांची भेट घेऊन त्यांच्याकडे १४५० रुपयांचा मदतीचा धनादेश साेपवण्याची. धनादेश स्वीकारण्याची विनंती करणारा एक अर्जही त्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने लिहिला. पण अांदाेलनातील नेत्यांच्या गर्दीमुळे त्याला आत जाताच आले नाही.

शिक्षणासाठी हॉटेलमध्ये काम
सूरजचे मूळ गाव हे माजलगाव तालुक्यातील अाहे. त्याचे अाई-वडील ऊसताेड मजूर अाहेत. त्याला तीन माेठे भाऊ अाहेत. सर्वजण मजुरी करतात. सूरज हा बीडमध्ये शिक्षणासाठी हाॅटेलमध्ये काम करून राहत अाहे. ताे केएसके महाविद्यालयातील कला शाखेचा विद्यार्थी अाहे.
सूरज कवी अन् कथालेखक
सूरजने कविता लिहिल्या अाहेत. त्या स्थानिक वर्तमानपत्रांच्या दिवाळी अंकातही त्याच्या कविता प्रकाशित झाल्या. त्याने तीन कथा लिहिल्या अाहेत. यात चांडाळ, प्रेमाची अग्निपरीक्षा व गळफास यासाठी नऊ गाणीही तयार केली अाहेत. हे चित्रपटात प्रदर्शित व्हावे अशी त्याची अपेक्षा अाहे.

काही दिवसांपूर्वी टिपचे जमा झालेले दीड हजार रुपये घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात गेलो होतो. जिल्हाधिकारी साहेबांची भेटही झाली. त्यांनी अास्थेवाईक चाैकशी, विचारणा केली. मी त्यांना डीडी देताे, असे म्हणालो. त्यानंतर अाज भेट घेतली, मात्र माेर्चा असल्याने साहेबांची कामे पाहून मंगळवारी त्यांना भेटणार आहे.
सूरज राधाकिशन उफाडे, विद्यार्थी
बातम्या आणखी आहेत...