आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तहानलेल्‍या लातूरकडे निघाली पाणी एक्‍स्प्रेसची दुसरी खेप, सायंकाळपर्यंत मिळेल पाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मिरजहून लातूरसाठी पाणी घेऊन निघालेली रेल्वे मंगळवारी दाखल होताच तहानलेल्या चेहऱ्यांवर हास्य तरळले. उत्सुकतेपोटी रेल्वेस्टेशनवर लोकांनी गर्दी केली.छाया : श्याम भट्टड - Divya Marathi
मिरजहून लातूरसाठी पाणी घेऊन निघालेली रेल्वे मंगळवारी दाखल होताच तहानलेल्या चेहऱ्यांवर हास्य तरळले. उत्सुकतेपोटी रेल्वेस्टेशनवर लोकांनी गर्दी केली.छाया : श्याम भट्टड
लातूर - तहानलेल्‍या लातूरात पाण्याची पहिली पाणी एक्स्प्रेस दाखल झाल्यानंतर आज दुसरी ट्रेनही लातूरकडे रवाना झाली आहे. सकाळी 11 च्या दरम्यान 5 लाख लिटर पाणी भरुन ही एक्स्प्रेस लातूरच्या दिशेने रवाना झाली. सायंकाळी सातवाजेपर्यंत लातूरमध्‍ये पाणी पोहोचण्‍याची शक्‍यता आहे. एखाद्या शहराला रेल्वेने पाणीपुरवठा करण्याचा ऐतिहासिक क्षण मंगळवारी पहिल्या पाणी एक्स्प्रेसच्या माध्यमातून सत्यात उतरला. आठ महिने ज्याची चर्चा होती ती मिरजहून निघालेली रेल्वे मंगळवारी पहाटे पाच वाजता लातूर रेल्वेस्थानकावर पोहोचली.

पाणी घेऊन रेल्वेस्टेशनवर येत असल्याचे समजताच अनेक लोक स्टेशनकडे धावले. आता प्रतीक्षा संपली. शिटीचा मोठा आवाज आिण नंतर ब्रेकचा आवाज करत रेल्वे थांबली. १० वॅगनमध्ये गच्च भरलेले पाणी पाहून लोक रेल्वेच्या दिशेने धावले. पोलिसांना अनेकांना थांबवावे लागले. काही लोकांनी सोबत हार आणि नारळ आणले होते. रेल्वेला हार घालून, नारळ फोडून पाण्याचे स्वागत झाले. ज्या चालकाने ही रेल्वे आणली त्याचाही लोकांनी प्रेमाने सत्कार केला... कारण त्याने रेल्वेतून पाणी नव्हे, जीवनच आणले होते...

८ महिन्यांपासूनच्या मूर्त स्वरूप
- जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी ऑगस्ट महिन्यातच रेल्वेने पाणी आणण्याचा विचार एका पत्रकार परिषदेत बोलून दाखवला होता.
- सुरेश प्रभूंनी राज्य शासनाच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवत कोट्यामध्ये रेल्वे उपलब्ध असल्याचे ट्विट केले.
- प्रत्येकी ५० हजार लिटर पाणी क्षमतेच्या दहा वॅगन असे एकूण ५ लाख लिटर पाणी यातून आले.
- टँकर फिलिंग पाॅइंटद्वारे टँकर भरून हे पाणी शुद्धीकरण केंद्रात नेले. तेथे शुद्ध करून पुरवठा सुरू झाला.
पुढील स्लाईडवर वाचा... पीएमओने वदवून घेतली होती मंगळवारच्या पहाटेची वेळ, प्रशासनाच्या सूचनेमुळेच सात तासांऐवजी १८ तासांनंतर रेल्वे लातूरला पोहोचली, पाणी उतरवून घ्यायला लागले तीन तास , पाण्याची रेल्वे आणि राजकारण, अधिकाऱ्यांनी जागून काढल्या दोन रात्री...