आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडीचा कडाका: बचावासाठी पशुधनाच्या अंगावर पोत्यांची झूल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तेर- आठवड्यापासून थंडीचा कडाका वाढत हे. त्यामुळे नागरिकांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी ऊबदार कपडे खरेदी केले आहेत. मात्र, पशुपालकांनी पशुधनाच्या अंगावर पोत्यांची झूल टाकून थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे काही प्रमाणात जनावरांचा थंडीपासून बचाव होत आहे. कडाक्याच्या थंडीमुळे दुभत्या जनावरांच्या दुधावरही परिणाम होताना दिसून येत आहे.

कडाक्याची थंडी वाढल्यामुळे नागरिकांनी ऊबदार कपडे खरेदी करून बचाव केला आहे. मात्र, जनावरांचा थंडीपासून बचाव करणे कठीण आहे. उस्मानाबाद तालुक्यातील तेर परिसरातील काही शेतकऱ्यांनी जनावरांच्या अंगावर पोत्यांच्या झुली टाकल्या आहेत. कडाक्याच्या थंडीमुळे दुभत्या जनावरांचे दूध कमी होत आहे. तसेच लहान वासरांना त्रास होत आहे. यामुळे पशुपालक लहान व दुभत्या जनावरांच्या अंगावर पोत्यांचे पांघरून घालत आहेत. यामुळे काही प्रमाणात जनावरांचाही थंडीपासून बचाव होण्यास मदत होत आहे. तसेच सततच्या दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांचे ज्वारीचे पीकही वाया जाण्याची शक्यता आहे. आठ दिवसांपासून थंडीचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. त्यामुळे हरभरा, गहू, ज्वारीच्या पिकांवर परिणाम होत आहे. रब्बी हंगामातील पिकांचे दाणे भरण्याच्या सुरुवातीलाच थंडीची लाट आली आहे. यामुळे ज्वारीच्या कणसातून ज्वारीचे दाणे बाहेर पडत नाहीत. तसेच इतर पिकांवरही परिणाम होणार आहे. काही भागात कमी पावसावरही ज्वारी चांगल्या प्रकारे आली होती. थंडीमुळे शेतकऱ्यांना केवळ कडबाच मिळणार आहे. प्रत्येक हंगामात कोणत्या ना कोणत्या संकटाने शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्यामुळे बळीराजा मेटाकुटीला आला आहे. यंदा तर वर्षभर खाण्यासाठी मिळणारी ज्वारीही मिळणे अशक्य झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी वाढल्या आहेत.
थंडीमुळे दुभत्या जनावरांचे दूध झाले कमी
जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून थंडी वाढली. यामुळे दुभत्या जनावरांच्या दुधावर झाला असून पाच लिटर दूध देणारे पशुधन चार लिटर दुधावर आले आहे. यामुळे पशुपालकांचे नुकसान होत आहे. थंडीमुळे दुभती जनावरे पाणी पीत नसल्यामुळे दुधाला कमी येत आहेत. यासाठी जनावरांच्या अंगावर पोत्यांचे पांघरून टाकून थंडीपासून बचाव केला जात असल्याचे पशुपालकांनी सांगितले आहे.
थंडीत जनावरे पाणी कमी पितात
थंडीमध्ये पशुधन पाणी कमी पित असल्यामुळे दूधकमी येत आहेत. दुभत्या जनावरांनी पाणी जास्त प्यावे यासाठी पेंढीमध्ये अधिक मीठ टाकले जाते. मात्र, कडाक्याची थंडी पडल्यावर पशुधन पाण्याला तोंड लावत नाहीत. यामुळे दूध कमी होत असून नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे जनावरांचा थंडीपासून बचाव केला आहे.
- भुजंग ढोबळे, शेतकरी.