आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिवृष्टीमुळे साेयाबीनचा दर्जा घसरला; मूग, उडदातही मंदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - दहा दिवसांत पावसाने उघडीप दिल्यानंतर अाठवड्यात अाडत बाजारात अाेली बाजरी व साेेयाबीनची अावक सुरू झाली अाहे. दर्जा घसरल्याने भाव कमालीचा कमी मिळत अाहे. बाजारात बाजरीची अावक चांगली, पण ती अाेली असल्याने खरेदीदारांपुढेही पेच अाहे.
बीड येथील अाडत बाजारात मागील चार दिवसांपासून बाजरीची माेठ्या प्रमाणात अावक हाेत अाहे. परंतु पावसामुळे काळवंडली असून अाेली अाहे. त्यामुळे खरेदीदारांपुढे पेच अाहे. मागील अाठवड्याच्या तुलनेत बाजरीच्या दरात अाणखी घसरण झाली. या बाजरीचा उपयाेग कॅटलफीडसाठी हाेणार अाहे. भाव १ हजार ५० ते ११२५ रुपये क्विंटल हाेते. गुरुवारी बाजरीची एक हजार क्विंटल अावक झाली, तर शुक्रवारी ५०० क्विंटल अावक झाली. साेयाबीनही डागी अाणि अाेले असल्याने दर्जा घसरलेला अाहे. भाव क्विंटलमागे दाेन हजार रुपये ते २७०० रुपये मिळाला. दरम्यान, मागील अाठवड्याच्या तुलनेत क्विंटलमागे मुगाच्या दरात १५० ते २००, तर उडदात ४०० ते ५०० रुपयांची तूट झाल्याचे अाडत व्यापारी विष्णुदास बियाणी यांनी सांगितले. त्यामुळे हरभऱ्याचे भाव ९ हजार ते ९ हजार ५०० रुपये क्विंटल हाेते. परळीच्या बाजारात कॅटलफीड बाजरीची ४०० क्विंटल अावक झाली. भाव १२६० रुपये हाेते. साेयबीनची ७०० क्विंटल अावक झाली असून भाव २ हजार २ हजार २०० रुपये हाेते. हायब्रीड ज्वारी कॅटलफीडचे भाव १२०० ते १२७० रुपये हाेते. दरम्यान ज्वारीचे भाव वधारले असून क्विंटलमागे ३०० रुपयांपर्यंत तेजी हाेती.
गेवराईच्या अाडत बाजारातही अाेल्या व सुमार दर्जाच्या साेयाबीन व बाजरीची अावक हाेत असल्याने खरेदीदारांपुढे विविध अडचणी उद््भवत असल्याचे व्यापारी अजित काला यांनी सांगितले. येथील बाजारात अाठवड्यात दाेन हजार क्विंटल बाजरीची अावक झाली. भाव बाराशे रुपयांपर्यंत हाेते. साेयाबीनचे भाव १७०० ते २८०० रुपयांपर्यंत दर्जानुसार हाेते.
खाद्यासाठी राजस्थानी बाजरी : बाजारात खाण्यासाठी मागणी वाढल्यास ग्राहकांना राजस्थानच्या बाजरीवर अवलंबून राहावे लागणार अाहे. खाण्यास याेग्य व दर्जेदार राजस्थानी बाजरीचा भाव सध्या १६४० ते १७४० रुपये प्रतिक्विंटल अाहे. अलवर, दाैसा अादी बाजारांतून अावक हाेत अाहे.
अाेलेपणा, वास : पावसामुळे मराठवाड्यातील बहुतांश भागात बाजरी अाेली व काळी असल्याने या बाजरीचे कॅटलफीडसाठी प्रतिक्विंटल १३५० ते १४०० रुपयांप्रमाणे व्यवहार हाेत अाहेत. अाेलेपणा अाणि वासामुळे पशुदेखील खातील की नाही, अशी शंका अाहे.
बातम्या आणखी आहेत...