आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Water Destation: Jalna's Eight Priligrime Returned

जल महाप्रलय: जालन्याचे आठ यात्रेकरू परतले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - जालन्याहून उत्तराखंडला गेलेले आठ भाविक शुक्रवारी दुपारी एक वाजता सचखंड एक्स्प्रेसने सुखरूप परतले. भाविक सुखरूप आल्याच्या आनंदाने नातलगांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते.


उत्तराखंडमध्ये 33 भाविक गेल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडे सुरुवातीला आली होती. त्यानंतर यात 7 भाविकांची वाढ होऊन ही संख्या 40 झाली होती. दरम्यान, यातील आठ भाविक जालन्यात परतले आहेत. उर्वरित 33 पैकी 25 सुरक्षित असून 8 भाविकांशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. शरद गंगाधरराव खोत, कुंडलिकराव भिवा राजपुरे व विश्वनाथ बळीराम शेरकर (छत्रपती कॉलनी, जुना जालना), आत्मानंद भक्त (35), सुलोचनादेवी रामचंद्र भक्त (68), लीलाबाई हुकूमचंद चौधरी (65), पार्वती नेहरू चौधरी (40) व सोनिया धनराज चौधरी (16, सर्व रा. जिंदल कॉम्प्लेक्ससमोर, नवीन जालना) अशी परत आलेल्या भाविकांची नावे आहेत. रेल्वेस्थानकावर पोहोचताच भाविकांच्या नातलगांनी पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले.