आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडीमध्ये दीड टक्के वाढला जलसाठा, सध्या 6 टक्के पाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात धिम्या गतीने वाढ होत असून सहा दिवसांत केवळ दीड टक्के नवीन पाण्याची वाढ झाली आहे. रविवारी (दि. १) रात्री जायकवाडीसाठी वरील धरणातून पाणी सोडण्यात आले. हे पाणी तीन दिवसांपासून जायकवाडीत दाखल होत असल्याने १.३७ टक्के पाणी वाढले आहे.
जायकवाडी धरणात पाणी येण्यापूर्वी जायकवाडीतील पाणीसाठा ४.३३ टक्के होता. आता हा पाणीसाठा ६ टक्के झाला. सध्या जायकवाडीत ७ हजार ३०७ क्युसेक वेगाने वरील धरणातून पाणी दाखल होत आहे. मुळा ४९७ क्युसेक या कमी वेगाने पाणी येत आहे. दारणाचे पाणीदेखील कमी करण्यात आले असून शुक्रवारी दारणातून ३ हजार ९५० क्युसेकने पाण्याची आवक आहे. गंगापूर धरणातून ३ हजार क्युसेकची आवक होत आहे, तर निळवंडेचे पाणी या सहा दिवसांतही जायकवाडीत दाखल झाले नाही. शनिवारी संध्याकाळी ते पाणी दाखल होण्याची शक्यता असल्याची माहिती शाखा अभियंता अशोक चव्हाण यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...