आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Water Level Of Jaikwadi Is Same As It Was Before

जायकवाडीच्या सहा दलघमी पाण्याची बचत, वातावरणातील बदलामुळे पाणीसाठा जैसे थे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - राज्यभरात तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने कहर केला असला तरी या अवकाळी पावसाचा फायदा मात्र जायकवाडी धरणाच्या पाणी बचतीवर झाला आहे. या तीन दिवसांत सहा दलघमी पाण्याची बचत झाली असून यंदा धरणाच्या पाण्याचे बाष्पीभवनाचे प्रमाण मागील तीन वर्षांच्या तुलनेत निम्म्यापेक्षा कमी झाले आहे.

मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, पैठणसह साडेतीनशे गावांना जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा होतो, तर दोन लाख हेक्टर क्षेत्र धरणामुळे ओलिताखाली आले आहे. यंदाही शेतीसह उद्योगांना पुरेसे पाणी धरणातून मिळाले. सध्या धरणाचा पाणीसाठा १० टक्क्यांवर आहे. पावसाळा व लागवडीपूर्वी हा पाणीसाठा एक टक्क्यावर येईल, असा अंदाज पाटबंधारे विभागाने व्यक्त केला होता. मात्र, उन्हाळ्याच्या प्रारंभापासूनच वातावरणात बदल हाेत गेले. यामुळे रोज होणारे उन्हाळ्यातील बाष्पीभवनाचे प्रमाण निम्म्याहून कमी झाले आहे.
उन्हाळ्यात साधारणपणे एक दलघमी पाण्याचे रोज बाष्पीभवन होते. त्याचे प्रमाण यंदा तीन वर्षांत सर्वात कमी झाले. वातावरणातील थंडपणामुळे बाष्पीभवन कमी झाले असले तरी पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने धरणाचा साठा झापाट्याने खालावत चालला होता. त्यातच सिंचनासाठी दोन वेळा पाणी सोडले. शिवाय आपेगाव, हिरडपुरी बंधाऱ्यात तिसऱ्यांदा पाणी सोडावे लागले. सध्याही परळी थर्मलसाठी कालव्यातून ३०० क्युसेकने पाणी सुरू असून महिनाभरातच धरणाचा पाणीसाठा २३ टक्क्यांवरून १० टक्क्यांवर आला आहे. मात्र, याच कालावधीत तीन वेळेस पैठणसह परिसरात व धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. पावसाने धरणातील बाष्पीभवनासह

धरणाच्या पाणीसाठ्यात सहा दलघमीची बचत झाली.
तीन वर्षांत प्रथमच बचत - उन्हाळ्यादरम्यान सलग तीन वर्षे जायकवाडीचा पाणीसाठा मृत जलसाठ्यावर आला होता. यामध्ये कोणतीच बचत यादरम्यान झालेली नोंद नसली तरी यंदा मात्र उन्हाळ्यात अवकाळीमुळे पाण्याची बचत झाल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितले.
दररोज लागणारे पाणी
५० दलघमी
औरंगाबाद ग्रामीण
१५० दलघमी रोज
औरंगाबाद
२२
जालना
डाव्या कालव्यातून ३०० क्युसेकने परळी थर्मलसाठी पाणी