आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Water Problem Of Village Because Of Unseasonable Rain

अवकाळीचा दिलासा; पाच सिमेंट बंधारे तुडुंब, गावाचा पाणीप्रश्न सुटला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजलगाव - वादळी वा-यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले असले तरी माजलगाव तालुक्यातील वांगी गावात हा पाऊस ग्रामस्थांना दिलासा देणारा ठरला आहे. अवकाळी पाऊस बरसल्याने सहा फूट उंचीचे पाच बंधारे ओसंडून वाहू लागले असून दोनशे हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. कोरड्या पडलेल्या तलावात ३० टक्के पाणी साठले आहे.

माजलगाव तालुक्यातील वांगी गावाची लोकसंख्या साडेतीन हजार असून गावात पिण्याच्या पाण्यासाठी भारत निर्माण योजनेअंतर्गत गावाशेजारी असलेल्या तलावात विहीर खोदून पाइपलाइन करण्यात आली होती. विशेष म्हणजे २०१३-१४ मध्ये कोरडवाहू शेती अभियानातून वांगी शिवारात वॉटर लेव्हल, जलसिंचन क्षेत्र वाढण्यासाठी पाच ठिकाणी सिमेंट चाळीस लाख रुपये खर्च करून बंधारे बांधण्यात आले होते. आता बंधाऱ्याचे काम पूर्ण होऊन जवळपास दोन वर्षे झाली आहेत. मागील दोन वर्षांपासून अत्यंत कमी पाऊस होत असल्याने पाचही बंधा-्यांत पाणीच साचले नव्हते. त्याचबरोबर तलावात पाणी नसल्याने शेतकऱ्यांची पिके धोक्यात सापडली होती. गावास पाणीपुरवठा करणारी विहीरदेखील कोरडी पडल्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती.

अवकाळी पावसामुळे गावालगतचे पाच बंधारे भरले आहेत, तर कोरडाठाक पडलेल्या तलावात ३० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. एकीकडे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची ज्वारी,बाजरी, अांबे, द्राक्षे, खरबूज, टरबुजांचे नुकसान झाले असले तरी दुसरीकडे भर उन्हाळ्यात शेतक-यांना दिलासा मिळाला आहे.

बंधा-याचे पाणी शेतीला
पाच बंधा-यांतील पाणी शेतीसाठी वापरले जाणार आहे. परंतु तलवातील पाणी मात्र शेतीला वापरले जाणार नाही. कारण हे पाणी शेतीसाठी दिले जाणार नाही तर पिण्यासाठी आरक्षित ठेवले जाणार आहे. कोरड्या पडलेल्या तलावात ३०% पाणी साठले आहे

दोन बोअरचे पाणी : वांगी शिवारात अवकाळी पावसामुळे सहा फूट उंचीचे पाच सिमेंट बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यामुळे या परिसरातील दोनशे हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. सध्या दोन बोअरचा गावाला पाणीपुरवठा होत आहे.