आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चितेगावात पाणीटंचाई, 3 टँकरवर गावाची मदार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - पैठण तालुक्यातील झपाट्याने वाढलेल्या औद्योगिक वसाहतीचे गाव म्हणून चितेगावचा परिचय आहे. परंतु आता चितेगावची ओळख कायम पाणीटंचाईचे गाव अशी होत असून पंचवीस हजारांच्या वर लोकसंख्या असलेल्या चितेगावात नवीन कामगार वसाहतीमध्ये आजही टंचाईच्या झळा कायम आहे. या वसाहतींची  तहान कायमस्वरूपी जायकवाडीहून औरंगाबादला पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनच्या लीकेजवर भागली जात आहे.
 
लोकसंख्येच्या तुलनेत टँकरची संख्या तोकडी असून त्यात गावात असलेली जुनी पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरली आहे. यावर चितेगावची तहान कशी भागणार अशी ओरड आता होत आहे, तर कामगारांचे येथे मतदान नसल्याने त्यांच्या वसाहतीकडे लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याची बाब समोर आली आहे.   
 
पैठण तालुक्यातील चितेगावची ओळख आता कंपन्यांमुळे नावारूपाला आले आहे. परिसरात कंपन्यांमुळे रोजगाराचा प्रश्न सुटला असला तरी पाण्याचा कायमस्वरूपी गंभीर प्रश्न कायम आहे. जुन्या गावात असलेल्या नळांना कधी पाणी येते, तर कधी नाही अशी परिस्थिती आहे.
गावात जे तीन टँकर सुरू आहे. ते गावात खेपा टाकतात, तर शेजारीच असलेल्या कामगार वसाहतीत मात्र नागरिकांना शंभर रुपये ड्रमप्रमाणे पाणी विकत घ्यावे लागते. येथे बोअरवेल असले तरी उन्हाळ्यात बोअरवेलला पाणी राहत नाही. त्यामुळे येथील नागरिकांना २४ तास हंडे, कॅन घेऊन पाइपलाइनच्या व्हॉल्व्हवर अवलंबून
राहावे लागते.  
 
ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष:  चितेगाव  ग्रामपंचायतीचे येथील जुन्या चितेगावमधील पाणीटंचाईकडे लक्ष राहते. मात्र, कामगारांचे मतदान नसल्याकारणाने कामगार राहत असलेल्या नवीन चितेगावमध्ये तीव्र टंचाईचा सामना कामगारांना करावा लागत आहे.   
 
पाइपलाइनवर घाव :  येथील कामगारांना कायम आपली तहान औरंगाबाद पाइपलाइनवर भागवावी लागते. मात्र, त्यातही औरंगाबाद महानगरपालिका या पाइपलाइनची गळती बंद करते, त्यातून येथील नागरिक थेट पाइपलाइन फोडल्याची घटना समोर येत आहेत. आम्हाला कायम औरंगाबादच्या पाइपलाइनवर तहान भागवावी लागत असल्याचे येथील कामगारांचे
म्हणणे आहे.
 
टँकर वाढवू
चितेगावची वाढती लोकसंख्या पाहता तेथे तीन टँकर सुरू करण्यात आले आहेत. मात्र, नवीन चितेगाव म्हणून ओळखले जाणारे व कामगार राहतात तेथे काहीशी पाणीटंचाई आहे. मागणी वाढली तर टँकर वाढले जातील.
- सुधाकर काकडे, पाणीपुरवठा विभाग, पंचायत समिती
 
बातम्या आणखी आहेत...