आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकल्प आटला, बुडीत क्षेत्रात हिरवळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद - खुलताबाद शहरासह अनेक गावांची तहान भागवणार्‍या येसगाव प्रकल्पासह खुलताबाद तालुक्यातील लहान-मोठे तलाव दुष्काळी परिस्थितीमुळे कोरडेठाक पडले आहेत. परिणामी शहरासह परिसरातील गावांवर पिण्याच्या पाण्याचे संकट ओढवले आहे, तर दुसरीकडे येसगाव प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात असलेल्या विहिरीतून लाखो लिटर पाणी उपसा करून पिके घेतली जात असून औरंगाबाद लघु पाटबंधारे विभाग मात्र कार्यवाही करता शेतकर्‍यांकडून गाळपेरा वसुली करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

खुलताबाद तालुक्यात यंदा पावसाने दगा दिल्याने शासनाने हा तालुका दुष्काळ जाहीर केला आहे. तालुक्यातील पाझर तलाव, गावतलाव, साठवण तलाव, कोल्हापूर बंधारे, भूमिगत बंधारे, सिमेंट बंधार्‍यासह येसगाव प्रकल्पही कोरडा पडला आहे. दुष्काळामुळे खुलताबाद फुलंब्रीसह खुलताबाद तालुक्यातील अठरा गावांवर पाण्याचे संकट ओढवले आहे. असे असतानाही येसगाव प्रकल्पात काही शेतकरी लघुपाटबंधारे अधिकार्‍यांच्या आशीर्वादाने बुडीत क्षेत्रातील विहिरीतील लाखो लिटर पाणी उपसा करत असताना औरंगाबाद लघु पाटबंधारे विभाग मात्र बुडीत क्षेत्रातील विहिरीतून उपसा होत असलेल्या पाण्याकडे लक्ष घालता शेतकर्‍यांकडून गाळपेरा वसूल करत आहे.

पाणी उपसा थांबवणार
बुडीत क्षेत्रातील २० ते २५ शेतकर्‍यांकडून गाळपेरा ८०० रुपयांप्रमाणे प्रतिएकर वसूल करण्यात आला असून पाणीपट्टी ७० ते ८० हजार रुपये वसूल करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बुडीत क्षेत्रातील विद्युत पुरवठा बंद करण्याकरता विद्युत विभागाला पत्र देण्यात आले असून बुडीत क्षेत्रात विहिरींचा उपसा होत असलेले पाणी ताबडतोब थांबवण्यात येईल. ए.आर. जाधव, कालवा निरीक्षक

पाझर तलाव
या वर्षी खुलताबाद तालुक्यात कमी पाऊस पडल्याने तालुक्यातील बहुतांश तळ्यात पाणी आले नाही. त्यात येसगाव प्रकल्पात थेंबभरदेखील पाणी आले नाही. यामुळे खुलताबाद शहरावर पिण्याच्या पाण्याचे संकट ओढवले. २०१३ -१४ मध्ये झालेल्या पावसामुळे येसगाव प्रकल्पात पाणी साठले होते, तेच पाणी आजतागायत शहरवासीयांना मिळत होते.

असा आहे येसगाव प्रकल्प
१९८६मध्ये येसगाव प्रकल्पाची निर्मिती झाली असून या प्रकल्पाची लांबी किमी आहे, तर रुंदी सरासरी किमी आहे. प्रकल्पातील नदीच्या तळापासून ते पाळूपर्यंत १९ मीटर उंची आहे. पाण्याची साठवणक्षमता २४.५० दलघमी असून हा प्रकल्प तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. मात्र आजघडीस हा प्रकल्प कोरडाठाक पडला आहे, तर या प्रकल्पातील विहिरींचा काही जण वापर करत आहेत. आजपर्यंत सात वेळेस येसगाव प्रकल्प कोरडा पडल्याचे पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी बी.ए.सूर्यवंशी यांनी सांगितले.

लाखोलिटर पाण्याचा अपव्यय
औरंगाबादपाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक घेऊन प्रकल्पातील बुडीत क्षेत्रातील शेतकर्‍यांना पाणी देण्याचे आदेश दिले आहेत. असे असताना पाटबंधारे विभागातील अधिकारी बुडीत क्षेत्रातील शेतकर्‍यांशी हातमिळवणी करून गाळपेरा रकमेसह अन्य रक्कम वसूल करत असून लागवड केलेल्या पिकांना पाणी विहिरीतून भरून देण्याचे काम करत आहे. आजघडीस बुडीत क्षेत्रात गहू, उन्हाळी मका, कांदा, मेथी, टरबूज लागवड केली आहे. सर्वच िपके हिरवीगार आहेत, तर अन्य पिकांस लाखो लिटर पाणी दिले जात आहे.