आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा डोळ्यात पाणी आणणा-या पाणीटंचाईचे फोटो, सोशल मीडियावर जनजागृती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पुढचे युद्ध हे पाण्‍यासाठी असेल असे आपण ऐकतो. अशा भाकितांचे पुढे काय होईल हे येणारा काळ ठरवेल. पण आजच पाण्‍यासाठीचा संघर्ष पाहून कोणाच्‍याही डोळ्यातून पाणी येईल. मागील तीन ते चार वर्षांपासून अवघा महाराष्‍ट्र पाणीटंचाईचा सामना करत आहे. पाण्‍यावरून राज्‍यातील दोन प्रदेशांमध्‍ये आंदोलनं होतात. गावागावात नळावर मारामा-या होतात. एवढी भिषणता महाराष्‍ट्र पाहात आहे. गेल्‍या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पाणी वाचवा या मोहिमेतून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्‍यात येत आहे.
दाहक वास्‍तव..
मराठवाडा चार वर्षांपासून दुष्‍काळ सोसत आहे. पाण्‍यासाठी टाचा घासण्‍याची व जनावरांना विकण्‍याची वेळ राज्‍यातील शेतक-यांवर आली आहे. परिस्‍थिती एवढी बिकट झाली की, पाण्‍यावरुन कायदा आणि सुव्‍यवस्‍था धोक्‍यात येते. तिजोरीसारखे टाकीमध्‍ये कुलूप लावून पाणी ठेवावे लागते. अखेर लातूरसारख्‍या शहरात पाण्‍यासाठी रेल्‍वेने पुरवठा पर्याय निवडावा लागतो. भीषण पाणीटंचाई केवल लातूरातच नाही. महाराष्‍ट्रातील विविध जिल्‍हे कमी अधिक प्रमाण या टंचाईला तोंड देत आहेत. दुष्‍काळाचे दाहक वास्‍तवही सोशल मीडियावर दिसत आहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, राज्‍यातील भिषण पाणीटंचाई दर्शवणारे फोटो..